Authored by रमेश पडवळ | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 2 Nov 2022, 7:12 am

Thane News : मराठी नावाच्या पाट्या लावण्यासंदर्भात राजकीय पक्षांकडून आक्रमक पवित्रा घेतला जात असून या संदर्भात कायदाही लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र दुकाने व संस्था अधिनियमामध्ये (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) बदल करण्यात आला आहे.

 

Thane News
मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर ठाण्यात कारवाई; १५ दुकानदारांकडून साडेतीन लाखांचा दंड वसूल
ठाणे : दुकाने व व्यापारी संस्थांचे फलक मराठी (देवनागरी) लिपीमध्ये प्रदर्शित न करणाऱ्या जिल्ह्यातील १५३ दुकाने आणि व्यापारी आस्थापनांच्या मालकांविरोधात कामगार उपायुक्त कार्यालयाच्या वतीने फौजदारी कारवाई करण्यात आली. तर, १५ दुकान मालकांना सुमारे साडेतीन लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुकाने आणि संस्थांनी आपले नामफलक मराठीमध्ये लावण्याचे आवाहन कामगार आयुक्त सं. सं. भोसले यांनी केले आहे.

मराठी नावाच्या पाट्या लावण्यासंदर्भात राजकीय पक्षांकडून आक्रमक पवित्रा घेतला जात असून या संदर्भात कायदाही लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र दुकाने व संस्था अधिनियमामध्ये (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) बदल करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यामध्ये ४५७ दुकाने व व्यापारी आस्थापनांना निरीक्षण भेटी देण्यात आल्या. त्यातील ३०४ दुकानांची आणि आस्थापनांची नावे मराठीमध्ये असल्याचे आढळून आले. मात्र, मराठी नामफलक प्रदर्शित न केलेल्या १५३ दुकाने आणि व्यापारी आस्थापनांच्या मालकांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली.

या T 20 World Cup 2022 मध्ये अजूनपर्यंत एकही सामना न गमावलेला संघ कोणता, जाणून घ्या…
एका मालकास २ लाख ८६ हजारांचा दंड

अधिनियमातील तरतुदीनुसार १५ आस्थापना मालकांनी कामगार उपायुक्त आणि प्रशमन अधिकाऱ्यांकडे गुन्हा मान्य केल्याचे आढळून आले. त्रुटींच्या पुर्ततेसह १५ आस्थापना मालकांना ३ लाख ४९ हजार ५०० रु. इतका दंड आकारण्यात आला. यापैकी एका आस्थापना मालकाला २ लाख ८६ हजार दंड आकारण्यात आला असल्याची माहिती कामगार उपायुक्त भोसले यांनी दिली.

सरकारे बदलली; पण, पनवेलची अर्थकोंडी कायम; १२०० कोटींच्या जीएसटी थकबाकीचा प्रश्न न्यायालयात

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

35 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here