मुंबई (योगेश बडे) : ‘नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो’चे (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडे यांची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर सिंह यांना मुंबईत मुख्यालय असलेल्या क्षेत्रीय कार्यालयातून हलविण्यात आले आहे. ज्ञानेश्वर सिंह यांच्याविरुद्ध समीर वानखेडे यांनी अलिकडेच राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगात तक्रार केली होती.

कोर्डेलिया अमली पदार्थ प्रकरणात गैरव्यवहार झाल्याच्या आरोपानंतर या प्रकरणातील बहुचर्चित तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध एनसीबीने दक्षता चौकशी सुरु केली होती. त्या चौकशी समितीचे प्रमुख ज्ञानेश्वर सिंह होते. त्यांनी मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात आठ अन्य अधिकाऱ्यांसह जवळपास १० दिवस वानखेडे तसेच या प्रकरणाशी संबंधितांची चौकशी केली होती. त्यानुसार वानखेडे यांच्याविरुद्ध तीन हजार पानी अहवाल मुख्यालयाकडे सादर केला होता. त्याआधारेच वानखेडे यांची चेन्नईला बदली करण्यात आली.

या T 20 World Cup 2022 मध्ये अजूनपर्यंत एकही सामना न गमावलेला संघ कोणता, जाणून घ्या…
या सर्व घडामोडींदरम्यानच विशेष दक्षता समितीचे प्रमुख म्हणून पदभार असतानाच ज्ञानेश्वर सिंह यांच्याकडे नैऋत्य क्षेत्राचे प्रमुख म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. नैऋत्य क्षेत्रात महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, छत्तीसगड, केरळ, तमिळनाडू व आंध्र प्रदेश यांचा समावेश होतो. त्याचे मुख्यालय मात्र मुंबईत आहे. आता मागील आठवड्यात वानखेडे यांनी तक्रार केल्यानंतर ज्ञानेश्वर सिंह यांच्याकडून हा प्रभार काढून घेण्यात आला आहे. एनसीबी मुख्यालयात उप महासंचालक असलेले सचिन जैन यांना आता नैऋत्य क्षेत्र प्रमुख करण्यात आले आहे.

काय होती वानखेडे यांची तक्रार?

ज्ञानेश्वर सिंह यांनी चौकशीदरम्यान मानसिक छळ व भेदभाव केला. तसेच अपमानीत करणारे प्रश्न विचारले. खोटे आरोप लावले, अशा आशयाची तक्रार समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगात केली होती. यासंबंधी आयोग लवकरच चौकशी सुरू करणार असताना ज्ञानेश्वर सिंह यांची तडकाफडकी बदली झाली आहे.

मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर ठाण्यात कारवाई; १५ दुकानदारांकडून साडेतीन लाखांचा दंड वसूल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here