मुंबई: आयटी क्षेत्रातील दिग्गज टेक महिंद्राने आपल्या गुंतवणूकदारांना एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. टेक महिंद्राच्या गुंतवणूकदारांना कंपनीकडून विशेष लाभांश मिळणार आहे. कंपनीने आज बीएसई म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या फायलींगद्वारे ही माहिती दिली आहे.

जर तुमच्याकडे टेक महिंद्राचे शेअर्स असतील तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. गुंतवणूकदारांना लवकरच १८ रुपयांचा विशेष लाभांश मिळणार आहे. कंपनीने आपल्या फाइलिंगमध्ये म्हटले आहे की प्रत्येक ५ रुपयांच्या इक्विटी शेअरसाठी १८ रुपयांचा विशेष लाभांश दिला जाईल. कंपनीने आपल्या शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या ३६० टक्के विशेष लाभांश म्हणून देण्याची घोषणा केली आहे. मात्र, कंपनीने गुंतवणूकदारांना अंतरिम लाभांश देण्याची घोषणाही केली आहे.

शेअर बाजार उघडताच घसरला, सेन्सेक्स-निफ्टी लाल चिन्हात; फेडच्या निर्णयावर गुंतवणूकदारांची नजर
रेकॉर्ड डेट काय?
टेक महिंद्राच्या गुंतवणूकदारांना विशेष लाभांश जाहीर करण्यात आला असून यासाठी १० नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. टेक महिंद्राच्या बोर्डाने गुंतवणूकदारांना विशेष लाभांश देण्यास मान्यता दिली आहे. याशिवाय, कंपनीने आपल्या विशेष लाभांशाची एक्स-डेट ९ नोव्हेंबर ठेवली आहे.

शेअरधारकांना दमदार कमाईची संधी, FMCG कंपनी देणार २५० टक्क्यांचा अंतरिम लाभांश
भारतीय बाजारपेठेतील शेअर्सची सेटलमेंट T + १ च्या आधारे केली जाते. म्हणजेच ज्या दिवशी शेअर्सची खरेदी-विक्री होते. त्याच्या एक दिवसानंतर सेटलमेंट होते. जर गुंतवणूकदारांना टेक महिंद्राच्या विशेष लाभांशाचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांना मुदतीपूर्वी कंपनीचे शेअर्स खरेदी करावे लागतील. कंपनीने सांगितले की २४ नोव्हेंबर रोजी गुंतवणूकदारांना विशेष लाभांश दिला जाईल. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांनी 10 नोव्हेंबरपूर्वी हे शेअर्स खरेदी केले आहेत, त्यांनाच मिळणार आहे.

कमाईची तिहेरी संधी; या आठवड्यात तीन कंपन्यांचे IPO ओपन होणार, तपशील जाणून घ्या
रेकॉर्ड आणि एक्स डिव्हिडंट तारीख म्हणजे काय ?
कोणत्याही शेअर्सची रेकॉर्ड डेट म्हणजे गुंतवणूकदारांकडे कंपनीचे शेअर्स या तारखेपूर्वी असणे आवश्यक आहे. यामुळे लाभांश मिळण्यास पात्र असलेल्या गुंतवणूकदारांची ओळख पटवणे सोपे होते. याशिवाय, एक्स-डिव्हिडंड तारीख ही कोणत्याही गुंतवणूकदारासाठी शेअर्स खरेदी करण्याची शेवटची तारीख असते. गुंतवणूकदारांनी एक्स-डिव्हिडंड तारखेनंतर शेअर्स खरेदी केल्यास त्यांना लाभांशाचा लाभ मिळत नाही.

यापूर्वीही कंपनीकडून लाभांश
टेक महिंद्राने गेल्या आर्थिक वर्षात ९०० टक्क्यांपर्यंत लाभांश दिला होता. गेल्या १२ महिन्यांत कंपनीने इक्विटी लाभांश जाहीर केला होता, जो प्रति शेअर ४५ रुपये निश्चित करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here