Patil Prashant | Maharashtra Times | Updated: 2 Nov 2022, 10:48 am

Mumbai Local Train : वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे पनवेल रेल्वे स्थानकावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. हार्बरचं वेळापत्रक कोलमडल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाल्याचं सांगण्यात येत आहे.

 

Mumbai Local Train
हार्बर मार्गावरील लोकल सेवा २० ते २५ मिनिटे उशिरा; नागरिकांचे प्रचंड हाल
मुंबई : हार्बर मार्गावरील वाहतूक आज सकाळपासून विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. परिणामी या मार्गावरील गाड्या २० ते २५ मिनिट उशिराने धावत आहेत. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा विस्कळीत झाल्याने कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे पनवेल रेल्वे स्थानकावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. हार्बरचं वेळापत्रक कोलमडल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाल्याचं सांगण्यात येत आहे. लोकल सेवा विस्कळीत झाल्याने सकाळी कामावर जाण्याच्या गडबडीत असणाऱ्या चाकरमान्यांना मोठा फटका बसला. तसंच अनेक नागरिकांनी पर्यायी वाहतूक साधनांचा अवलंब केल्याचं पाहायला मिळालं.

शेअर बाजार उघडताच घसरला, सेन्सेक्स-निफ्टी लाल चिन्हात; फेडच्या निर्णयावर गुंतवणूकदारांची नजर

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here