नाशिक : म्हसरुळ परिसरात असलेल्या जलसंपदा विभागाच्या मेरी वसाहतीत हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मेरी शासकीय वसाहतीत हत्या झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. नाशिकच्या जलसंपदा विभागात क्लर्क म्हणून कार्यरत असणाऱ्या संजय वायकंडे याचा गळा आवळून हत्या झाल्याची माहिती मिळाली आहे. संजय वायकंडे यांची गावी गेलेली पत्नी घरी परत आल्याने ही घटना उघडकीस आली. मृतदेहाचा शव विच्छेदन अहवाल प्राप्त होताच, या अहवालात हत्या झाल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, संजय यांच्या पत्नी दिवाळी निमित्ताने गावी गेल्या होत्या, गावावरुन घरी परतल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आल्याने संपूर्ण मेरी – म्हसरुळ परिसरात खळबळ उडाली आहे. जय वायकंडे यांची पत्नी घरी नसताना त्यांची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. मेरीच्या शासकीय वसाहतीत असलेल्या घरी येऊन संजय यांची हत्या झाल्यानं अनेक शंका – कुशंका उपस्थित होऊ लागल्याने मेरी वसाहत परिसरात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

पावसामुळे भारताचं वर्ल्ड कप स्वप्न भंगणार? आजच्या सामन्यानंतर असं असेल सेमीफायनलचं समीकरण
नाशिक शहरातील पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिंडोरी रोडवर असलेल्या मेरी शासकीय वसाहतीत राहणारे संजय वायकंडे हे नाशिकच्या जलसंपदा विभागात क्लार्क म्हणून कार्यरत होते. संजय यांच्या पत्नी गावावरून आल्या त्यावेळेस संजय हे बेडरुममध्ये पडलेले होते. संजय यांना अगोदर एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना तिथून शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला. शासकीय रुग्णालयात नेताच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आणि त्यांचा मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाब उघड झाली त्यांचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली.

घरी कोणी नसताना गळा आवळून हत्या का करण्यात आली आणि कोणी केली याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे राहिले आहे. याप्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला असून. या घटनेचा पंचवटी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

पुलाची दुरुस्ती केलीच नाही, १३५ जणांचा जीव गेल्यानंतर मॅनेजर म्हणतो, ‘ही तर देवाची इच्छा…’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here