LIC ने काय म्हटले?
“३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत कंपनीतील हिस्सा ५ टक्क्यांच्या वर गेला आहे. तर ३ डिसेंबर २०२१ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत रु. ४५५.६९ च्या सरासरी खर्चाने शेअर्स विकत घेतले गेले,” असे आयुर्वीमा मंडळाने सांगितले. दरम्यान, नियामक नियमांनुसार जेव्हा कंपनीत त्यांची भागीदारी ५ टक्क्यांपेक्षा जास्त असते तेव्हा लिस्टेड (सूचिबद्ध) कंपन्यांनी स्टॉक एक्स्चेंजला माहिती देणे आवश्यक असते.
झुनझुनवालांची हिस्सेदारी १% पेक्षा जास्त
एलआयसी व्यतिरिक्त दिवंगत दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचा टाटा मोटर्समध्ये १ टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे. त्यांच्याकडे टाटा ग्रुपच्या ऑटो कंपनीचे ३,६७,५०,००० इक्विटी शेअर्स आहेत. भारतीय शेअर बाजाराचे ‘बिग बुल’ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे या वर्षी ऑगस्टमध्ये निधन झाले.
शेअर्समध्ये तेजी
एलआयसीचा मंगळवारी शेअर बीएसईवर ६०५.३० रुपयांवर बंद झाला, जो मागील बंदच्या तुलनेत ०.२२ टक्क्यांनी वाढला. तर टाटा मोटर्सचा शेअर २.१६ टक्क्यांनी वाढून ४२१.५० रुपयांवर बंद झाला. आयआयएफएल सिक्युरिटीनुसार पुढील एका आठवड्यात कंपनीचे शेअर्स ४३५ रुपयांपर्यंत जाऊ शकतात. टाटा मोटर्स ९ नोव्हेंबर रोजी २०२२-२३ या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करेल. ऑटो कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या एका वर्षात १३.७०% घसरण झाली आहे, तर यावर्षी आतापर्यंत १५ टक्केपेक्षा जास्त घसरण झाली मात्र, एका महिन्यात त्यात सुमारे ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
खरेदी की विक्री, काय करावे?
जागतिक ब्रोकरेज जेफरीजने टाटा मोटर्सला खरेदी सल्ला दिला आहे. ब्रोकरेजने स्टॉकची लक्ष्य किंमत ५४० रुपये ठेवली आहे, म्हणजेच सध्याच्या किमतीवरून यामध्ये २८% रिटर्न दिला जाऊ शकतो.