Traffic clearance vehicle | मुंबई पोलिसांच्या संरक्षण आणि सुरक्षा विभागाने वाहतूक खात्याला तशा सूचना दिल्या आहेत. अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेत करण्यात आलेल्या वाढीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनीदेखील भाष्य केले. अमृता फडणवीस यांनी वाय दर्जाच्या सुरक्षेची मागणी केली नव्हती. पण अमृता फडणवीस यांना असलेला धोका लक्षात घेता उच्चस्तरीय समितीने सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला.

हायलाइट्स:
- अमृता फडणवीस यांच्या दिमतीला एक एस्कॉर्ट व्हॅन आणि पाच पोलीस कर्मचारी असतील
- पोलिसांची सुरक्षा ही २४ तास असेल
देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याने नुकतेच यासंदर्भातील आदेश जारी केले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या संरक्षण आणि सुरक्षा विभागाने वाहतूक खात्याला तशा सूचना दिल्या आहेत. अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेत करण्यात आलेल्या वाढीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनीदेखील भाष्य केले. अमृता फडणवीस यांनी वाय दर्जाच्या सुरक्षेची मागणी केली नव्हती. पण अमृता फडणवीस यांना असलेला धोका लक्षात घेता उच्चस्तरीय समितीने सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला. तसेच अमृता यांच्याकडून ट्रॅफिक क्लिअरन्स व्हेईलकची मागणीही करण्यात आली नव्हती. हा निर्णय झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनीही मुंबई पोलिसांना आपल्याला ट्रॅफिक क्लिअरन्स व्हेईलकची गरज नसल्याचे सांगितल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
ठाकरे कुटुंब आणि अनेक बड्या लोकांना आतापर्यंत ट्रॅफिक क्लिअरन्स व्हेईकलची सुविधा पुरवण्यात आली आहे. यासाठी कोणतेही पद असणे गरजेचे नसते. तर संबंधित व्यक्तीला असणारा धोका लक्षात घेऊन यासंदर्भात निर्णय घेतला जातो. त्यामुळे आमदार नसणाऱ्या व्यक्तीलाही झेड किंवा झेड प्लस दर्जाची सुरक्षा मिळते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅफिक क्लिअरन्स व्हेईलक शक्यतो संवैधानिक पदावरील व्यक्तीला दिली जाते. सध्या ठाकरे कुटुंबातील रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या दिमतीला दोन एस्कॉर्ट व्हॅन आहेत, पण वाहतूक विभागाची सुविधा त्यांना नाही. एखाद्याच्या ताफ्यात एस्कॉर्ट व्हॅन असल्यास त्यांच्याकडून वाहतुकीच्या स्थितीचा आढावा घेतला जातो. तसेच संबंधित नेत्याच्या प्रवासादरम्यान वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील याची काळजी घेतली जाते. फक्त मुख्यमंत्री किंवा एसपीजी दर्जाची सुरक्षा असलेल्या व्यक्तीसाठीच वाहतूक रोखून धरली जाते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.