मुंबई: बॉलिवूड अभिनेता याच्या मृत्यूला एक महिना उलटून गेलाय. पोलिसांच्या चौकशीत ही आत्महत्या असल्याचं समोर आलंय. परंतु, अजूनही सुशांतच्या चाहत्यांना यावर विश्वास बसत नाहीए. सुशांतच्या आत्महत्येचं खरं कारण समोर आलं पाहिजे यासाठी सीबीआय चौकशीची मागणी जोर धरू लागली असतानाच सुशांतची गर्लफ्रेंड हिनं देखील गृहमंत्री यांच्याकडे या प्रकरणाची आता सीबीआय चौकशी करा अशी मागणी केली आहे.

रियानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. अमित शहा सर, मी सुशांतची गर्लफ्रेंड. सुशांतच्या अकस्मात निधनाला आता एक महिना होऊन गेलाय. माझा सरकारवर पूर्ण विश्वास आहे. सुशांतला न्याय मिळावा यासाठी हात जोडून विनंती करते की, या प्रकरणाची सीबीआय द्वारे तपास करण्यात यावा. मला फक्त एकच गोष्ट जाणून घ्यायची आहे ती म्हणजे सुशांतवर अशा कोणत्या प्रकारचा दबाव होता ज्यामुळं त्यानं इतकं टोकाचं पाऊल उचललं आहे’, असं रियानं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

१४ तारखेला सुशांतच्या मृ्त्यूला एक महिना झाल्यापासून रिचा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. तिनं त्याच्यासाठी भावुक पोस्ट शेअर करत त्याच्याबद्दलच्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती. आज तिनं आणखी काही पोस्ट शेअर करत सुशांतच्या निधनानंतर तिला धमक्या येत असल्याचं म्हटलं आहे. सुशांतच्या आत्महत्येचा रिया जबाबदार असल्याचं सुशांतच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं गेल्या एका महिन्यापासून तिच्यावर सातत्यानं टीका होत आहे. याच टीकेला उत्तर देण्यासाठी तिनं आता सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. रियाला अनेकप्रकारच्या धमक्या येत आहेत. रियानं यातील काही स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ट्रोल करणाऱ्या व्यक्तीनं लिहिलं की, जर रियानं आत्महत्या केली नाही तर तिच्यावर बलात्कार करण्यात येईल आणि तिची हत्या करण्यात येईल.

रियानं स्क्रीनशॉट शेअर करत म्हटलं की, मला गोल्ड डिगर (पैशांसाठी कोणाला तरी फसवणारे) म्हणण्यात आले मी शांत राहिली. मला हत्यारा म्हणण्यात आलं मी शांत राहिले.. माझ्या चारित्र्यावर चिखलफेक झाली मी तरीही शांत राहिले. पण मी आत्महत्या केली नाही तर तुम्हाला माझा बलात्कार करण्याचा आणि माझी हत्या करण्याचा अधिकार कोणी दिला. तू जे हे लिहिलं त्याचं गांभीर्य तरी तुला कळतंय का.. हा एक गुन्हा आहे. कायदेशीररित्या तुम्ही कोणाला असं बोलू शकत नाही. रियाने या पोस्टम्ये सायबर क्राइम हेल्पलाइनलाही टॅग केलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here