सुनिल दिवाण, पंढरपूर : कार्तिकी यात्रा ( Kartiki Ekadashi ) दोन दिवसांवर येऊन ठेपली असतानाच पंढरपूरमध्ये धोकादायक इमारतींना आता प्रशासनाने नोटीस देण्यास सुरुवात केली आहे. शहरात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक धोकादायक इमारती आहे. या इमारती पाडण्यात अनेक अडचणी असल्याने प्रत्येक यात्रेपूर्वी आशा इमारतींना पालिका प्रशासन नोटीस देत असते.

धोकादायक इमारती, मठ, जुने वाडे यामध्ये भाविक निवसास थांबल्यास मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतली जाते. या वर्षी पाऊसकाळ चांगला होऊन परतीचा पाऊसही जोरात झाला. यामुळे जवळपास १३७ इमारती अधिक धोकादायक बनल्या आहेत. या इमारतींचे प्रकरण वर्षानुवर्षे कोर्टात अडकली आहेत. आता हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

pandharpur administration notice

कातिर्की यात्रेसाठी पंढरपूरला जाताय? मग पाहा प्रशासनाने बाजवलेली ही नोटीस


भीषण! दिंडीत चालणाऱ्या वारकऱ्यांना कारने चिरडलं; ७ जणांचा मृत्यू, ८ गंभीर

शहरातील या धोकादायक इमारतींचा प्रश्न सुटल्यास प्रदक्षिणा मार्ग आणि मंदिर परिसरातील या वास्तूंचा धोका वारकऱ्यांना होणार नाही. सध्यातरी या धोकादायक इमारती, मठ आणि वाडे यातमध्ये कुणीही वास्तव्य करू नये, असे आवाहन पंढरपूर नगरपालिकेने केले आहे.

डीसले गुरुजींना नडणारे शिक्षणाधिकारी ACB च्या जाळ्यात,२५ हजारांची लाच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here