“देवानेच तुम्हाला माझ्या मुलाला वाचविण्यासाठी पाठविले होते. तुम्ही देवासारखे धावून आले, तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही”, अशा शब्दात अपघातातून बचावलेल्या महिलेने आरपीएफ जवान अक्षय सोये यांचे आभार मानले. आरपीएफ जवान अक्षय सोये हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील पंचक गावचे आहेत. ते रेल्वे सुरक्षा बलात सीआयबी या विभागात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दाखवलेले धाडस आणि समयसूचकतेमुळे बाळाचे प्राण वाचले असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Home Maharashtra jalgaon local news, लोकलमध्ये चढताना पाय घसरला, लेकरासह आई रेल्वेखाली; आरपीएफच्या जवानामुळे...
jalgaon local news, लोकलमध्ये चढताना पाय घसरला, लेकरासह आई रेल्वेखाली; आरपीएफच्या जवानामुळे अनर्थ टळला; थरारक Video – video while climbing in the local the mother slipped under the train and the accident was averted due to the help of the rpf jawan
जळगाव : लहान मुलाला घेऊन लोकलमध्ये चढत असताना एका महिलेचा तोल जाऊन खाली पडत असताना त्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या आरपीएफचे जवान अक्षय सोये यांनी मोठ्या हिमतीने रेल्वेखाली जाणाऱ्या बाळाला वाचवलं आहे. ही धक्कादायक घटना मुंबई मधील मानखुर्द रेल्वे स्थानकावर काल मंगळवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली आहे. ही संपूर्ण थरारक घटना रेल्वे स्थानकावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.