Maharashtra Politics | एखाद्या नेत्याला एका राज्यात सुरक्षा असेल तर दुसऱ्या राज्यात ही सुरक्षा लाभते. डॉ. नितीन राऊत यांची सुरक्षा महाराष्ट्र सरकारने काढून घेतल्याने तेलंगणात त्यांना सुरक्षा नव्हती. त्यामुळे नितीन राऊत (Nitin Raut) हे व्हीआयपी नसल्याचे स्थानिक पोलिसांच्या लक्षात आले नाही. गर्दी आणि धक्काबुक्कीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.

 

Shinde Fadnavis govt decision
शिंदे-फडणवीस सरकार

हायलाइट्स:

  • गर्दी आणि धक्काबुक्कीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.
  • नितीन राऊत हे व्हीआयपी नसल्याचे स्थानिक पोलिसांच्या लक्षात आले नाही
मुंबई: काँग्रेसचे विदर्भातील ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उर्जामंत्री नितीन राऊत हे मंगळवारी तेलंगणात ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान झालेल्या धक्काबुक्कीत जखमी झाले. नितीन राऊत यांच्या चेहऱ्याला जबर मार लागला आहे. सध्या हैदराबादमधील एका रुग्णालयात नितीन राऊत (Nitin Raut) यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, आता काही जणांकडून या दुर्घटनेचे खापर शिंदे-फडणवीस सरकारवर फोडले जात आहे. काही दिवसांपूर्वीच शिंदे-फडणवीस सरकारने संजय राऊत (Sanjay Raut), भास्कर जाधव, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतील १७ नेत्यांची सुरक्षा काढून घेतली होती. यामध्ये नितीन राऊत यांचाही समावेश होता. (Nitin Raut hospitalized after being pushed during Bharat Jodo Yatra)

त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नितीन राऊत यांच्यासोबत पोलिसांची सुरक्षा नव्हती. एखाद्या नेत्याला एका राज्यात सुरक्षा असेल तर दुसऱ्या राज्यात ही सुरक्षा लाभते. डॉ. नितीन राऊत यांची सुरक्षा महाराष्ट्र सरकारने काढून घेतल्याने तेलंगणात त्यांना सुरक्षा नव्हती. त्यामुळे नितीन राऊत हे व्हीआयपी नसल्याचे स्थानिक पोलिसांच्या लक्षात आले नाही. गर्दी आणि धक्काबुक्कीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांनी सामान्य माणूस समजून दिलेल्या धक्क्याने डॉ. नितीन राऊत खाली पडले आणि जखमी झाले. कदाचित सुरक्षा असती तर ही दुर्घटना घडली नसती. त्यामुळे नितीन राऊत हे जखमी होण्यासाठी एकप्रकारे शिंदे-फडणवीस सरकारच जबाबदार आहे, असा आरोप काही जणांकडून केला जात आहे.
भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील बड्या नेत्याला धक्काबुक्की; चेहऱ्याचा भाग फ्रॅक्चर, डोळाही पडला काळानिळा

नेमकं काय घडलं?

नितीन राऊत हैदराबादमध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. नितीन राऊत हे यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत चालत होते. राहुल गांधी यांना पाहण्यासाठी रस्त्यावर लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीवर नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना बरेच कष्ट करावे लागत होते. पोलीस लोकांना राहुल गांधी यांच्यापासून दूर ठेवायचा प्रयत्न करत होते. यावेळी तेलंगणातील एका एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने नितीन राऊत यांना जोरात ढकलले.
मविआ नेत्यांची सुरक्षा हटवली, नार्वेकरांची सिक्युरिटी मात्र टाईट, शिंदे-फडणवीसांचा इरादा काय?
पोलीस अधिकाऱ्याने नितीन राऊत यांना ढकलले तेव्हा ते जमिनीवर आपटले. यावेळी त्यांचं डोकं जमिनीवर आपटणार होतं. त्यापासून वाचण्यासाठी नितीन राऊत यांनी डोक्याभोवती हात ठेवला होता. मात्र, या नादात त्यांचा चेहऱ्याला मार लागला. त्यांच्या उजव्या डोळ्याला जबर मार लागला असून डोळ्याच्या भुवईचा भाग कापला गेला आहे. त्यामुळे त्यांचा डोळा अक्षरश: काळानिळा पडला होता. त्यांच्या हातापायालाही खरचटले आहे. यानंतर नितीन राऊत यांना उपचारासाठी हैदराबादच्या बासेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here