Maharashtra Politics | अंधेरी पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. अंधेरी पूर्वमध्ये एकूण २,७१,००० मतदार आहेत. मतदारसंघात ३८ ठिकाणी २५६ केंद्रांवर मतदान होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी अंधेरीतील नागरिकांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. बनावट सर्व्हे सोशल मीडियावर व्हायरल.

 

Andheri bypoll fake survey
अंधेरी पूर्व पोटनिवडणूक

हायलाइट्स:

  • अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबरला मतदान
  • ठाकरे गटाच्या या तक्रारीनंतर विरोधकही आक्रमक
मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मात्र, या शेवटच्या तासांमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्यासमोर एक वेगळेच आव्हान उभे राहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून अंधेरी पूर्व मतदारसंघात पडद्यामागून ‘नोटा’ला मत टाका, यासाठी पद्धतशीरपणे प्रचार केला जात आहे. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तक्रारही करण्यात आली होती. अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri Bypoll) एका सर्वेक्षणाचा दाखल देऊन ऋतुजा लटके यांच्यापेक्षा नोटाला जास्त मतं पडतील, असा प्रचार सुरु आहे. सोशल मीडिया आणि व्हॉटसअॅपवर फिरत असलेल्या या पोस्टमध्ये असा दावा केला आहे की, अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना ४१ हजार, नोटाला ४३ हजार आणि अपक्षांना सात हजाराच्या आसपास मतं पडतील. यानंतर ठाकरे गटाने हा सर्व्हे बनावट असल्याचा खुलासा केला आहे.
पवार-शेलारांच्या MCA कनेक्शनमुळे अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध? नाना पटोलेंचा संशय
ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी या संदर्भातील तक्रार निवडणूक आयोग आणि पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. आरपीआय आठवले गट या भाजपच्या एनडीएमधील मित्रपक्षाचे कार्यकर्ते नोटाला मतदान करावे, यासाठी पैसे वाटत असतानाचे व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या या तक्रारीनंतर विरोधकही आक्रमक झाले आहेत. ऋतुजा लटके यांना विजयाचा आत्मविश्वास असेल तर ठाकरे गट निवडणूक आयोगाकडे तक्रार का करत आहे. नोटाचा प्रचार करायचा नाही करायचा याची स्पष्टता आयोगाकडे मागत आहेत, हेच जर का माहित नाही मग इतके वर्षे राजकरणात काय करत होतात? असे मूर्खपणाचे आरोप करणारे तुमच्या सारखे मूर्ख असू शकतील पण ऐकणारे मूर्ख नसतात. त्यांना माहित आहे की, मतदानासाठी कोणते बटण दबायचे असते, ये डर होना ही चाहिए.. मग आता ठरलं तर, ३ नोव्हेंबर फक्त NOTA, अशा प्रचार विरोधी गोटातून होताना दिसत आहे.

fake poll

भाजप-शिंदे गटाला अतिआक्रमकपणा नडला; शिवसेनेची ‘मशाल’ अन् ऋतुजा लटकेंचा चेहरा चार दिवसांत घराघरात पोहोचला
दरम्यान, अनिल परब यांनी अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना ९८-९९ टक्के मतं मिळतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. अंधेरी पूर्वमध्ये एकूण २,७१,००० मतदार आहेत. मतदारसंघात ३८ ठिकाणी २५६ केंद्रांवर मतदान होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी अंधेरीतील नागरिकांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here