भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका पत्रकाद्वारे या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हयातभर अल्पसंख्याकांच्या अनुनयाला कडवा विरोध केला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांच्या भूमिकेचे विस्मरण झाले आहे का, असाही प्रश्न उपाध्ये यांनी केला आहे.
रझा अकादमीने ” या चित्रपटावर बंदीची मागणी केली आहे. या चित्रपटामुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावतील, असं रझा अकादमीचं म्हणणं आहे. खरंतर, इराणमधील दिग्दर्शक माजिद माजिदी यांनी २०१५ मध्ये बनवलेल्या या चित्रपटावर इस्लामी देश असलेल्या इराणमध्येही बंदीची मागणी केली गेलेली नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहमंत्री यांनी रझा अकादमीच्या मागणीची तातडीनं दखल घेत केंद्र सरकारकडे बंदीसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. यातून सत्ताधारी आघाडीला विशिष्ट धर्मियांचे लांगुलचालन करायचे आहे, हे स्पष्ट होत आहे. उद्धव ठाकरे यांचाही अनिल देशमुख यांच्या भूमिकेला पाठिंबा आहे का,’ असा प्रश्न उपाध्ये यांनी केला आहे.
रझा अकादमीच्या पत्राची तत्परतेने दखल घेणाऱ्या सरकारचे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठलाच्या आषाढी यात्रेकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष झाले होते. मानाच्या वारीसाठी हेलिकॉप्टरची देण्याची घोषणा करणाऱ्या व प्रत्यक्षात एसटीचे भाडेही वारकऱ्यांकडून वसूल करणाऱ्या या सरकारला वारकऱ्यांसाठी काही करायची इच्छा नव्हती, अशी टीकाही उपाध्ये यांनी केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times