अहमदनगर : जामखेड येथील भांड्याचे व्यापारी महेंद्र बोरा आपल्या कुटुंबीयांसह राजस्थानात देवदर्शनासाठी गेले होते. तेथून ते विमानाने पुण्यात सुखरूप परतले. त्यानंतर बोरा यांनी जामखेडपर्यंतचा प्रवास कारमधून सुरू केला. घर काही किलोमीटर अंतरावर असतानाच एका अवघड वळणावरील पुलावर त्यांची कार उलटली आणि पुलावरून खाली कोसळली. यामध्ये व्यापारी महेंद्र बोरा यांचा मृत्यू झाला तर कुटुंबातील तिघे जखमी झाले आहेत.
दरम्यान, जखमींना उपचारासाठी नगरच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मुलगा भूषण शांतिलाल बोरा किरकोळ जखमी झाला आहे.