Authored by चेतन सावंत | Edited by नुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 2 Nov 2022, 4:33 pm
Girl Died After Falling From Slide: दालिशा करण वर्मा ही आई-वडिलांसोबत घाटकोपरमधील नील योग मॉलमध्ये गेली होती. तिथे किड्स झोन झेनोक्स प्ले स्पेस याठिकाणी ती खेळण्यासाठी गेली. किड्स झोनमध्ये घसरगुंडीचा आनंद लुटत असताना अचानक तिचा तोल गेला आणि ती खाली पडली.

हायलाइट्स:
- मॉलमध्ये घसरगुंडीवर खेळताना तोल गेला
- डोक्याला मार लागून चिमुरडीचा मृत्यू
दालिशा करण वर्मा ही आई-वडिलांसोबत घाटकोपरमधील नील योग मॉलमध्ये (Neel Yog Mall Ghatkopar) गेली होती. तिथे किड्स झोन झेनोक्स प्ले स्पेस याठिकाणी ती खेळण्यासाठी गेली. किड्स झोनमध्ये घसरगुंडीचा आनंद लुटत असताना अचानक तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. या घटनेत तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ती बेशुद्ध पडली. तिच्या मेंदूतून रक्तस्त्राव होत असल्याचं लक्षात येताच तिला तात्काळ मुलुंडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टर तिच्यावर उपचार करतील त्यापूर्वीच या चिमुकलीने जीव सोडला.
पाहा व्हिडिओ –
साडेतीन वर्षांची दालिशा वर्मा ही चेंबूरच्या टिळकनगर परिसरात राहत होती. ती तिच्या आई-वडिलांसह घाटकोपरच्या नील योग मॉलमध्ये गेली होती. जिथे ही दुर्घटना घडली आहे. या घटनेने दालिशाच्या पालकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आपली चिमुकली डोळ्यादेखत गेल्याने त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीयेत. त्यामुळे आपल्या मुलांची काळजी घ्या. ते कुठे खेळत आहेत, ते सुरक्षित आहेत का याची खात्री करा.
माझ्या पायाला लागलं, पाठीला लागलं, आम्ही आठजण पुलाची जाळी पकडत वरती आलो : जखमी
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.