सीसीटीव्हीच्या आधारे लागला शोध
अपहरण प्रकरणाची तक्रार आल्यानंतर मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने ताबडतोब तपास सुरू केला. मुंबई येथील आरपीएफ इन्स्पेक्टर सिद्धाराम म्हेत्रे यांच्यामार्फत ३ संशयित महिला बाळ घेऊन जात असल्याचे फुटेज हाती लागले. मुंबईहून या तिन्ही महिला हैदराबादकडे निघाल्या होत्या. याबाबत सोलापूर आरपीएफला तात्काळ माहिती देण्यात आली. सोलापूर आरपीएफ जवानांनी हुसेन सागर एक्सप्रेस ही गाडी सोलापूर स्थानकात आल्याबरोबर संपूर्ण गाडी तपासली. जनरल डब्यामध्ये दोन महिला एका बलिकेला घेऊन बसल्या होत्या. तिकीट चेक करण्याच्या बहाने दोन्ही महिलांना खाली उतरवण्यात आले आणि सदर बालिकेला ताब्यात घेतले गेले.
मुलीच्या विक्रीचा प्लॅन फसला
मुंबई येथील सांताक्रुझ येथील फुटपाथवर झोपलेल्या १ वर्षीय मुलीचं सुदेतादेवी पासवान व शरिफा शेख या दोन महिलांनी अपहरण केलं होतं. सदर बालिकेला विकण्यासाठी मुंबईवरून हैदराबाद येथे आणण्यात आले होते. मात्र विक्रीचा प्रयत्न फसल्यामुळे दोन्ही महिला हुसेन-सागर एक्स्प्रेसने हैदराबादहून मुंबईकडे निघाल्या होत्या. हुसेन सागर एक्स्प्रेस सोलापूर स्थानकात प्लॅटफॉर्मवर क्रमांक ४ वर आली. सर्व गाडीची तपासणी केल्यानंतर शेवटी असणाऱ्या जनरल डब्यामध्ये दोन महिला एका मुलीला घेऊन बसल्याचं दिसून आले. विना तिकीट प्रवास करणाऱ्या या दोन्ही महिलांना खाली उतरून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं व सदर बालिकेस ताब्यात घेऊन आज सकाळी मुंबई रेल्वे पोलिसांकडे देण्यात आलं आहे.