राज्यातील भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ठाकरे सरकारनं अलीकडंच ‘महाजॉब्स’ हे ऑनलाइन पोर्टल सुरू केलं आहे. या पोर्टलची जाहिरात सध्या अनेक ठिकाणी प्रसिद्ध होत आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे छायाचित्र आहे. त्याचबरोबर , दिलीप वळसे-पाटील, नवाब मलिक व आदिती तटकरे यांची छायाचित्रे आहेत. हे सगळे मंत्री शिवसेना व राष्ट्रवादीचे आहेत. काँग्रेसच्या एकाही मंत्र्याचे छायाचित्र जाहिरातीत नाही. त्यावरूनच महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ‘महाजॉब्स’ ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की शिवसेना-राष्ट्रवादीची? होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही?,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खासदार राजीव सातव यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला. ‘सरकार आघाडीचे आहे. जनतेसमोर जाताना सर्वांनीच काळजी घ्यायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हे प्रकरण अधिक चिघळू नये म्हणून उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री यांनी ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. ‘जाहिरातीत काँग्रेस नेत्यांचे फोटो असणं गरजेचं आहे. सत्यजीत तांबे यांनी त्याच भावनेतून ट्विट केलं असेल. पण सुभाष देसाई यांनी याबाबत फोन करून दिलगिरी व्यक्त केली आहे,’ असं थोरात यांनी सांगितलं.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times