सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना आता त्यांचे एकेकाळचे शिष्य असलेल्या नितीन चौघुलेंकडून जोरदार आव्हान दिलं जाणार आहे. चौघुले यांच्या नेतृत्वाखालील शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या संस्थेने भिडेंच्या शिवप्रतिष्ठानच्या गडकोट मोहिमेप्रमाणे एक नवी मोहीम हाती घेतली आहे. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून राज्याचा बाहेर गडकोट मोहीम आयोजित करण्यात आली आहे. भिडे यांच्या गडकोट मोहिमेला टक्कर देण्यासाठी नितीन चौघुले यांनी थेट पानिपत मोहीम आयोजित केली आहे.
दरम्यान, या मोहिमेत प्रामुख्याने आग्रा, झाशी, जिंजी, अटक, पश्चिम बंगाल यासह अन्य स्थळांचा समावेश असल्याचं शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी सांगितलं आहे.