इटावा: उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये हुंड्यात मिळालेली कार अनेकांसाठी कर्दनकाळ ठरली. इटाव्याच्या इकदिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या काव्या मॅरेज हॉलमध्ये तिलकोत्सवाचा वैवाहिक कार्यक्रम सुरू होता. सर्व नातेवाईक आले होते. नवरदेव पोलीस दलात शिपाई असल्यानं हुंडाही भरपूर मिळाला. वधू पक्षानं टिळा लावण्याच्या कार्यक्रमातच नवरदेवाला कार भेट दिली.

नवरदेवाला हुंड्यात टाटा पंच कार मिळाली. अनेकजण उत्सुकतेनं कार पाहत होते. त्यावेळी काही नातेवाईक जेवत होते. डीजे सुरू होता. त्यावर नातेवाईक नाचत होते. दरम्यान कारची पूजा करण्यात आली. त्याचवेळी शिपाई असलेल्या नवरदेवाला कारमध्ये ड्रायव्हिंग सीटवर बसवण्यात आलं.
रिसॉर्टमधील ट्रेझर हंट स्पर्धा जीवावर बेतली; खजिना शोधणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनीयरचा करुण अंत
नवरदेवानं कार सुरू केली. काही सेकंदात त्याचं कारवरील नियंत्रण सुटलं. जेवत असलेल्या पाहुण्यांना धडक देत कार हॉलच्या आत असलेल्या मंदिराच्या कठड्याला जाऊन आपटली. हॉलमध्ये आक्रोश, आरडाओरडा सुरू झाला. कारच्या धडकेत नवरदेवाची आत्या गंभीर जखमी झाली. रुग्णालयात नेत असताना तिचं निधन झालं. आणखी काही नातेवाईकदेखील जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कारसमोर नारळ फोडण्यात आल्यानं नवरदेवाच्या मेहुण्यानं कार सुरू करुन दाखवण्यास सांगितलं. नवरदेवानं कार सुरू केली आणि ती पुढच्या काही क्षणांत नियंत्रणाबाहेर गेली. जेवत असलेल्या पाहुण्यांना कारनं धडक दिली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. अनेक नातेवाईक कारच्या धडकेत जखमी झाल्याचं हॉलचा सुरक्षा रक्षक असलेल्या प्रेम बाबूनं सांगितलं.
तू सावळी आहेस! आमच्या कुटुंबात शोभत नाहीस! नवऱ्याचे सतत टोमणे; लग्नाच्या ६ महिन्यांनंतर…
नवरदेवाला टिळा लावल्यानंतर त्याला कार भेट देण्यात आली. त्यानं कार सुरू करताच ती नियंत्रणाबाहेर गेली. दुर्घटनेत माझ्या सख्ख्या बहिणीचा मृत्यू झाला आणि काही जण जखमी झाल्याचं नवरदेवाचे वडील जय नारायण यांनी सांगितलं. या प्रकरणी अद्याप पोलिसांना कोणतीही तक्रार मिळालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here