वाचा:
धनंजय मुंडे यांनी स्वत: ट्विट करून या खास सेलिब्रेशनची माहिती दिली आहे. ‘करोनामुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच येथे आदरणीय पवार साहेबांची भेट घेतली. सुप्रिया ताईंनी काल झालेल्या वाढदिवसानिमित्त केक आणला होता. राष्ट्रवादी काँग्रेस हे एक कुटुंब आहे. या कुटुंबाचा ‘आधारवड’ कायम आमच्या मागे भक्कम उभा असतो. धन्यवाद साहेब, ताई! असाच आशीर्वाद राहू द्या,’ अशा भावना मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत. मुंडे यांनी पवार कुटुंबाशी झालेल्या भेटीचे दोन फोटोही शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोमध्ये शरद पवार हे धनंजय यांना केक भरवताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाली होती. मुंबईतील रुग्णालयात काही दिवस उपचार घेतल्यानंतर ते करोनामुक्त झाले. घरी परतल्यानंतर काही दिवस ते क्वारंटाइन होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला वाढदिवस परळी येथील घरीच अत्यंत साधेपणानं साजरा केला होता. कार्यकर्त्यांनीही भेटायला येऊ नये असं आवाहन केलं होतं. त्यानंतर आज, वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी बारामती गाठून पवारांचे आशीर्वाद घेतले.
मागील विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून आपली चुलत बहीण पंकजा मुंडे यांचा पराभव करून धनंजय मुंडे हे मोठ्या मताधिक्यानं निवडून आले होते. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडली. त्यामुळं त्यांचं राजकीय वजन प्रचंड वाढलं आहे. या सगळ्या घडामोडीनंतरचा त्यांचा हा पहिला वाढदिवस होता.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times