ऍडलेड: टी-२० वर्ल्डकपमध्ये पुन्हा एकदा थरार पाहायला मिळाला. बांग्लादेशविरुद्धचा सामना भारतानं अखेरच्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर जिंकला. बांग्लादेशचा सलामीवर लिटन दासनं संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. पावसामुळे सामना ७ षटकांनंतर थांबला. त्यावेळी बांग्लादेश १७ धावांनी पुढे होता. डकवर्थ लुईसनुसार बांग्लादेशकडे आघाडी होती. त्यात आक्रमक खेळणारा दास अर्धशतक साजरं करून नाबाद होता. पण पाऊस तासाच्या पावसानं सामना फिरला. पावसानंतर बांग्लादेशची फलंदाजी घसरली आणि भारतानं थरारक सामन्यात ५ धावांनी विजय मिळवला.

चारपैकी तीन सामन्यांत विजय मिळवत भारताचे ६ गुण झाले आहेत. गट २ मध्ये भारत अव्वल स्थानी आहे. झिम्बाब्वेविरुद्धचा सामना शिल्लक आहे. तो जिंकल्यावर भारताचे ८ गुण होतील. तिथपर्यंत पोहोचणं पाकिस्तान आणि बांग्लादेशसाठी कठीण आहे. भारत झिम्बाब्वेविरुद्ध पराभूत झाला, तर पाकिस्तान आणि बांग्लादेश भारताशी उपांत्य फेरीसाठी नेट रनरेटवर स्पर्धा करू शकतात.
मैदान मोकळं असताना सामना फिरला; दास टीम इंडियाला नडला, पण ‘त्या’ ४५ मिनिटांत गेम झाला
भारतानं बांग्लादेशला नमवल्यानं पाकिस्तानची पुढची वाट आणखी बिकट झाली आहे. पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना गमावला, तर बाबर सेनेचं आव्हान संपुष्टात येईल. पाकिस्ताननं आफ्रिका आणि बांग्लादेशला पराभूत केल्यास त्यांचे ६ गुण होतील.
Ind vs Ban: काल द्रविडकडून पाठराखण, आज केएलचं अर्धशतक; विराटचा सल्ला अन् राहुलचा मैदानात कल्ला
पाकिस्तानचा उपांत्य फेरीतील प्रवेश आता पूर्णत: इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. झिम्बाब्वेनं बांग्लादेशला पराभूत करावं आणि नेदरलँडनं आफ्रिकेला हरवावं अशी प्रार्थना पाकिस्तानी चाहते करतील. असं घडल्यास पाकिस्तान गुणांच्या आधारावर आफ्रिकेला मागे टाकले आणि भारतासोबत नेट रनरेटवर स्पर्धा करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here