Pune Crime : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू शेती आणि पशुपालन करतात. त्याचा मुलगा समीर कामधंदा करीत नव्हता. त्याला दारुचे व्यसन होते. त्याच्यामुळे त्याचे लग्न जमत नसल्याने बाळू आणि समीर यांचा वारंवार वाद होत असे.

 

Pune Maval Murder

Pune News : मुलाला दारुचे व्यसन, त्यात बेरोजगार; अखेर जन्मदात्या बापाने पोटच्या मुलासोबत पाहा काय केलं

हायलाइट्स:

  • बापानेच मुलाची केली हत्या
  • मुलगा काम करत नसल्यामुळे सतत वाद
  • पुण्यातील मावळ तालुक्यातील घटना
पुणे : घरगुती वादातून कुऱ्हाडीने घाव घालून बापाने मुलाची हत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजता मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथे घडली. समीर बाळू बोरकर (वय ३४, रा. बोरकरवस्ती, सुदुंबरे, ता. मावळ) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. वडील बाळू बबन बोरकर (वय ५५) याला अटक केली आहे. समीरच्या भावजयीने (वय २८) या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू शेती आणि पशुपालन करतात. त्याचा मुलगा समीर कामधंदा करत नव्हता. त्याला दारुचे व्यसन होते. त्याच्यामुळे त्याचे लग्न जमत नसल्याने बाळू आणि समीर यांचा वारंवार वाद होत असे. बाळू यांची थोरली सून मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घरात स्वयंपाक करीत होती. त्या वेळी समीर हॉलमध्ये झोपला होता. बाळू अचानक घरी आले. त्यांनी कुऱ्हाडीच्या उलट्या बाजूने समीरच्या डोक्यात मारुन त्याची हत्या केली. समीरच्या भावजयीने हॉलमध्ये जाऊन पाहिले असता समीर हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. दरम्यान, संपूर्ण प्रकरणाचा तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीसाठी आज मतदान; यंत्रणा सज्ज

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here