वॉशिंग्टन: महागाईला आळा घालण्यासाठी अमेरिकेच्या केंद्रीय बँकेने पुन्हा एकदा कठोर पावले उचलली आहेत. अमेरिकेची केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्हने बुधवारी रात्री प्रमुख व्याजदरात वाढ केली. यूएस फेडने व्याजदरात ०.७५ टक्के वाढ केली आहे. दरम्यान, फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ करण्याचीही यंदा सलग चौथी वेळ आहे. यामुळे अमेरिकेचा धोरणात्मक व्याजदर ३.७५ टक्क्यांवरून ४ टक्के झाला आहे, जो २००८ नंतरचा उच्चांक आहे.

अमेरिकेत चलनवाढ ४० वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्यामुळे केंद्रीय बँक सतत व्याजदर वाढवत आहे. त्यामुळे जगातील इतर देशांनाही त्यांचे धोरण दर वाढवणे भाग पडत आहेत. आज, गुरुवारी आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची विशेष बैठक आहे. दुसरीकडे फेड रिझर्व्हच्या निर्णयाचा जगातील अन्य देशांप्रमाणे भारतीय बाजारावरही परिणाम पाहायला मिळाला. पण अमेरिकेतील निर्णयाचा भारतीय बाजारावर नक्की परिणाम होतो तरी कसा? काय आहे नेमकं कारण? या लेखातून आज आपण समजून घेऊया.

फेडरल रिझर्व्ह दरवाढीने भारतीय शेअर बाजारात खळबळ, सेन्सेक्स-निफ्टीत जोरदार घसरण
फेडरल रिझर्व्हने व्याज दरवाढीचा निर्णय घेतला, ज्यामुळे प्रमुख निर्देशांक गुरुवारी कमजोरीसह उघडले. बँकिंग, वित्तीय आणि आयटी समभागांमध्ये बाजारात घसरण दिसून आली. याशिवाय अमेरिकन बाजारातही विक्रीचा मूड पाहायला मिळाला आणि बाजाराचे प्रमुख निर्देशांक लाल चिन्हासह बंद झाले.

Stocks to Buy: कमाईसाठी तयार, आज बाजारात कोणत्या स्टॉक्सची राहणार चर्चा; पाहा लिस्ट
भारतीय बाजारात सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरले
गुरुवारी, सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स ४०० अंकांच्या घसरणीसह तर दुसरीकडे, निफ्टी १८,००० च्या पातळीवर कमजोरीसह व्यवहार करताना दिसत आहे. गुरुवारी सेन्सेक्स ३९४ अंकांच्या घसरणीसह ६०,५११ वर उघडला आणि निफ्टी ११४ अंकांनी घसरून १७,९६८ च्या पातळीवर पोहोचला. सुरुवातीच्या व्यवहारात रिलॅक्सोचे समभाग पाच टक्क्यांनी घसरले तर कर्नाटक बँकेचे समभाग दोन टक्क्यांनी वधारले.

टाटा ग्रुपच्या कंपनीचा स्टॉक बनला रॉकेट! ‘Buy’ की ‘Sell’ गुंतवणुकीपूर्वी वाचा ब्रोकरेज हाऊसचा सल्ला
अमेरिकन बाजारात घसरणीचे कारण?
महागाई दरात झालेली वाढ ही अमेरिकन बाजारातील घसरण होण्यामागील प्रमुख कारण आहे. येथील महागाईने ४० वर्षांचा उच्चांक गाठला आहे. अमेरिकेतील महागाई दर १९८१ नंतर मे महिन्यात ८.६% वर पोहोचला आहे. त्यामुळे फेड रिझव्‍‌र्हवर व्याजदर वाढवण्याचा दबाव असून त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे.

फेड रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्यानंतर अमेरिकन गुंतवणूकदारांची धारणा नकारात्मक होते, ज्याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून येतो. गुंतवणूकदार भारतीय बाजारात केलेली गुंतवणूक काढून घेतात. त्यामुळे विक्रीचा मारा झाल्याने भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण दिसून येते. भारतातील आयटी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर अमेरिकेवर अवलंबून आहे. याशिवाय अमेरिका जगातील सर्वात शक्तिशाली अर्थव्यवस्थेपैकी एक असून तेथील प्रत्येक घडामोडीचा परिणाम जगभरातील बाजारावर दिसून येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here