Bhide Guruji controversy | ‘तू आधी कुंकू लावून ये, मगच तुझ्याशी बोलेन’, असे सांगितले. आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री ही भारतमातेचे रूप आहे. भारतमाता विधवा नाही आहे. कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलतो, असे भिडे यांनी म्हटले. संभाजी भिडे यांच्या या बुरसटलेल्या मनोवृत्तीच्या वक्तव्यावर राज्यभरातून प्रचंड टीका झाली होती.

हायलाइट्स:
- संभाजी भिडे यांचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात
- सुप्रिया सुळेंनी भिडेंना फटकारले
सुप्रिया सुळे यांच्या त्यांच्या फेसबुक पेजवर हेरंब कुलकर्णी यांची ‘तू आणि मी’ ही कविता शेअर केली आहे. या कवितेमधून स्त्रीला दुय्यम स्थान देणाऱ्या मनोवृत्तीवर निशाणा साधण्यात आला आहे. यावर आता संभाजी भिडे यांचे समर्थक काही प्रतिक्रिया देतात का, हे पाहावे लागेल.
संभाजी भिडेंना ते वक्तव्य भोवणार?
संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराशी बोलताना केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. मात्र संभाजी भिडेंना हे वक्तव्य आता चांगलंच भोवणार असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने संभाजी भिडे यांना आपल्या भूमिकेचा तात्काळ खुलासा करण्यास सांगितले आहे. महिला पत्रकाराने कपाळावर टिकली लावली नाही म्हणून आपण तिच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. स्त्रीचा दर्जा तिच्या कर्तुत्वाने सिद्ध होत असतो. आपले वक्तव्य स्त्री सन्मानाला आणि सामाजिक दर्जाला ठेच पोहोचवणारे आहे, असे आयोगाने म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने त्याची दखल घेतली आहे. तरी कपाळावर टिकली नाही म्हणून महिला पत्रकारांशी बोलण्यास नकार देण्यामागील आपल्या भूमिकेचा खुलासा महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा १९९३ कलम १२ (२) व १२ (३) नुसार तात्काळ सादर करावा, अशी नोटीस महिला आयोगाकडून संभाजी भिडे यांना देण्यात आली आहे. यावर संभाजी भिडे काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.