t20 world cup: टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतानं बांगलादेशचा थरारक लढतीत पराभव केला. त्यामुळे भारताचं उपांत्य फेरीचं तिकीट जवळपास निश्चित झालं आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत भारतानं बांगलादेशला ५ धावांनी नमवलं. पावसानं व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारतानं बाजी मारली.

 

rohit sharma
ऍडलेड: टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतानं बांगलादेशचा थरारक लढतीत पराभव केला. त्यामुळे भारताचं उपांत्य फेरीचं तिकीट जवळपास निश्चित झालं आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत भारतानं बांगलादेशला ५ धावांनी नमवलं. पावसानं व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारतानं बाजी मारली. भारतानं २० षटकांत १८४ धावा केल्यानंतर बांगलादेशनं आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर लिटन दासनं घणाघाती अर्धशतक झळकावलं. मात्र त्यानंतर पाऊस आला आणि सामन्याचं चित्र बदललं. बांगलादेशला १६ षटकांत १५१ धावांचं आव्हान मिळालं. पावसानंतर बांगलादेशी फलंदाज ढेपाळले आणि भारतीय संघानं विजय खेचून आणला.

पावसानंतर खेळ सुरू होताच लिटन दास धावबाद झाला. लोकेश राहुलचा अचूक थ्रो थेट स्टम्पवर लागला आणि दासला माघारी परतावं लागलं. त्यानंतर आलेल्या फलंदाजांनी मोठे फटके खेळायच्या नादात बाद होऊ लागले. चार गडी बाद झाल्यावर बांगलादेशचा यष्टीरक्षक नुरुल हसन फलंदाजीला आला. त्यावेळी बांगलादेशची अवस्था ४ बाद १०० अशी होती.
पाकिस्तानची पुन्हा रडारड! पंचांच्या ‘त्या’ निर्णयावर जोरदार आक्षेप; भारताचा विजय झोंबला
नुरुल हसन नॉन स्ट्राईकरला असताना वारंवार गोलंदाजाआधी क्रिझ सोडत होता. ही बाब भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या लक्षात आली. हसनची कृती पाहून रोहित संतापला. त्यानं रोहितनं हसनला तातडीनं इशारा दिला. बाहेर निघालास तर स्टम्प उडवेन, असा थेट इशारा रोहितनं हसनला दिला.
मैदान मोकळं असताना सामना फिरला; दास टीम इंडियाला नडला, पण ‘त्या’ ४५ मिनिटांत गेम झाला
हसन मैदानावर आल्यानंतर बांगलादेशनं आणखी दोन फलंदाज सहा चेंडूंत गमावले. यानंतर हसननं गोलंदाज तस्किन अहमदच्या साथीनं भारताला झुंज दिली. ६ बाद १०८ अशा परिस्थितीतून दोघांनी फटकेबाजी सुरू केली. बांगलादेशला ३ षटकांत ४३ धावांची गरज होती. हसन आणि तस्कननं प्रयत्नांची शर्थ केली. मात्र भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा केला आणि ५ धावांनी सामना जिंकला.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here