मुंबई: राज्यात कौरवांचं राज्य असून या सरकारच्या गलथान कारभारावरून लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांची मुलाखत शिवसेनेचं मुखपत्र सामनाने घेतली अशी टीका भाजप नेते व राज्यसभा सदस्य यांनी केली. सत्तेचा दर्प चालत नाही, असे शरद पवार म्हणत आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस हे शांत स्वभावाचे आहेत आणि मी पुन्हा येईन, या त्यांच्या म्हणण्यात घमेंड नाही तर आत्मविश्वास आहे, असेही राणे यांनी नमूद केले. ( On )

वाचा:

शरद पवार यांच्याबद्दल मला आदर आहे आणि त्यांचा आदर ठेवूनच मी बोलत आहे, असे नमूद करत राणे यांनी सामना वर्तमानपत्राची जुनी अनेक कात्रणे पत्रकार परिषदेत झळकावली. सामनाच्या बातम्या असतील, अग्रलेख असतील, त्यातून नेहमीच पवारांवर टीका करण्यात आली. बाळासाहेब तसेच यांच्यासोबतच यांनीही अनेकदा पवारांवर टीका केली. ‘शरद पवार हे मॉडर्न अफझलखान’, ‘महाराष्ट्राचे खरे शत्रू शरद पवारच’, ‘शरद पवार कोण? चोरांचे सरदार गुंडाचे बादशहा’, अशी पवारांना लक्ष्य करणारी अनेक शिर्षकं सामनात छापून आली आहेत. त्याच पवारांचा आता शिवसेनेला आणि सामनाला पुळका कसा आला?, असा सवाल राणे यांनी केला. सामनात शरद पवार यांच्याइतकी टीका आजवर कुणावरही झाली नाही. त्यामुळेच आता घेतलेली मुलाखत हे केवळ आणि केवळ राजकारण आहे. राज्यात करोना साथीचे थैमान सुरू असताना त्यावरून लक्ष अन्यत्र वळवण्यासाठीच ही मुलाखत घेण्यात आली आहे, असा आरोपच राणे यांनी केला.

वाचा:

संजय राऊत यांनी ही मुलाखत ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. त्याची दुसऱ्या कुणी दखल घेतली नाही तरी शिवसैनिक मात्र नक्कीच घेणार आहेत. आधीची शिवसेना आणि आताची शिवसेना यातला फरक यानिमित्ताने शिवसैनिकांना कळून चुकला आहे. या मुलाखतीत एकप्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभारावरही टीका करण्यात आली. सरकारमध्ये संवाद नसल्याचे शरद पवार बोलले. हे सगळं पाहता संजय राऊत हे नोकरी सामनाची करतात आणि काम शरद पवार यांच्यासाठी करतात हे नव्याने स्पष्ट झाले, असा टोलाही राणे यांनी लगावला.

वाचा:

देशात सर्वाधिक करोना रुग्ण आणि मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. असे असताना हसतखेळत मुलाखत घेणाऱ्यांची कीव करावीशी वाटते. याना जनतेचं काहीच सोयरसुतक नाही, असा तीव्र संतापही राणे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना अडवू नका, असे आवाहन राणे यांनी पुन्हा एकदा केले. पिंजऱ्यात राहून सरकार चालत नाही, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here