बंगळुरु : कर्नाटकातील बंगुळुरुमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री बारमध्ये झालेल्या हाणामारीनंतर, पश्चिम बंगळुरुमध्ये एका २१ वर्षीय तरुणाच्या डाव्या आणि उजव्या हाताचा अंगठा चार बदमाशांनी छाटला आहे. (Gang War)

मूडलपल्यातील रहिवासी प्रज्वल हा बारमध्ये मित्रांसोबत पार्टी करत असताना काही तरुणांनी त्यांच्या टेबलावर टिश्यू पेपर फेकला. त्यानंतर दोन गटांत बाचाबाची झाली. या बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालंय. घटनास्थळावरुन प्रज्वलचा कापलेला हात आणि अंगठा गायब असून भटक्या कुत्र्यांनी तो खाऊन टाकला असावा, असा पोलिसांना संशय आहे.

Mumbai Local News : मध्ये रेल्वेची वाहतूक ठप्प; नेरळ स्थानकात मालवाहू गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्वल २९ ऑक्टोबरच्या रात्री तो मेघराज, योगेश आणि कौशिक या मित्रांसोबत लगरे येथील कदंबा बारमध्ये गेला होता. पुढच्या टेबलावर तरुणांचा याबाबत विचारलं आणि दोन्ही बाजूंनी शाब्दिक बाचाबाची झाली. बारमधील इतरांनी हस्तक्षेप केला आणि हा वाद मिटवला.

प्रज्वल आणि त्याच्या मित्रांनी जेवायला जायचं ठरवलं आणि महालक्ष्मी लेआउटजवळील कुरुबाराहल्ली येथील पाइपालाइन पार्कमध्ये त्यांची बाइक थांबवली. पहाटे १.३० वाचेच्या सुमारास ते तिथं धूम्रपान करत असताना बारमध्ये त्यांच्याशी भांडण करणारे चार तरुण एका कारमधून तिथे आले. इतर तिघांनी प्रज्वल आणि त्याच्या मित्रांवर हल्ला केला. या बदमाशांनी डोक्यात चाकूने वार केला, परंतु प्रज्वलने हल्ला रोखण्यासाठी हात वर केले. प्रज्वलच्या डाव्या हाताचं मनगट कापलं गेलं असून उजव्या हाताचा अंगठाही कापला आहे.

पाकिस्तानची पुन्हा रडारड! पंचांच्या ‘त्या’ निर्णयावर जोरदार आक्षेप; भारताचा विजय झोंबला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here