सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्यानुसार, रमानी घरी पोहोचले त्यावेळी अंधार होता. टॅक्सीमधून सामान उतरवल्यानंतर राजेश रमानी चालकाच्या शेजारच्या सीटवर बसले. चालकानं निळ्या रंगाची लाईट लावली. तिचा प्रकाश अगदी प्रखर होता. रमानी यांनी ५०० रुपयांच्या तीन नोटा पाकिटातून काढल्या आणि चालकाला दिल्या. मात्र चालकानं प्रकाशाचा फायदा घेत हातचलाखी केली आणि ५०० च्या नोटा घेत रमानी यांना १०० च्या नोटा दाखवल्या.
मी तीनशे रुपये दिल्याचं चालकानं मला सांगितलं. पण प्रत्यक्षात मी १५०० रुपये दिले होते. त्यानं निळ्या प्रकाशाचा गैरफायदा घेत नोटांची अदलाबदल केली. मी तुला ५०० च्या नोटा दिल्या असं मी त्याला वारंवार सांगितलं. पण तो १०० च्या नोटा हेच सांगत होता. त्यानं निळी लाईट बंद करून मला १०० च्या तीन नोटा दाखवल्या. अखेर मी त्याला १५०० रुपये दिले आणि पत्नी, मुलांसह घरी आलो. काही मिनिटांनंतर मी पाकिट तपासलं. तेव्हा मला त्यात ५०० ची केवळ एक नोट दिसली, असं राजेश रमानी यांनी सांगितलं.
यानंतर रमानी सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाकडे गेलो. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यांचा संशय खरा ठरला. त्यानंतर त्यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अंधार असल्यानं चालकाचा चेहरा आणि टॅक्सीचा नंबर सीसीटीव्हीत नीट दिसत नसल्याचं दहिसर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रविण पाटील यांनी सांगितलं. आम्ही एफआयआर दाखल केलेला नाही. मात्र प्रकरणाचा तपास सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली.
taxi fraud, साहेब, तुम्ही ५०० नाही, १०० च्या नोटा दिल्या! टॅक्सीतील ब्ल्यू लाईटनं स्कॅम; प्रवाशाला गंडा – cabbie distracts man with bright light dupes him of rs 1500 in mumbai
मुंबई: टॅक्सीतील निळ्या लाईटच्या मदतीनं चालकाला गंडा घालणाऱ्या चालकाचा शोध पोलीस घेत आहेत. चालकानं टॅक्सीतील निळ्या रंगाच्या प्रखर प्रकाशाच्या मदतीनं चालकाला दीड हजार रुपयांची फसवणूक केली आहे. हा संपूर्ण प्रकार प्रवाशाच्या इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.