अहमदनगर : अहमदनगरचा उड्डाणपूल पूर्णत्वास आल्यानंतर आता त्याचा श्रेयवाद रंगला आहे. भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी अलीकडेच पुलाची पहाणी केली. या पुलाचे उद्घाटन १९ नोव्हेंबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्याचे जाहीर केले. मात्र याची माहिती देताना यासाठी पाठपुरावा करणारे माजी खासदार दिलीप गांधी आणि माजी आमदार अनिल राठोड यांना योग्य ते श्रेय दिला नसल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केला. त्यामुळे आज नियोजित तारखेआधीच शिवसेना तसेच रथोडव गांधी समर्थकांनी पुलाचे उद्घाटन केल्याचं जाहीर केलं.

नगर शहरातील तयार झालेल्या बहुचर्चित उड्डाणपुलाची शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी पाहणी करुन औपचारिकरित्या नारळ फोडून उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेना राज्यसहसचिव विक्रम राठोड, उपजिल्हाप्रमुख गिरिष जाधव, माजी महापौर सुरेखा कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अशोक बडे, दत्ता कावरे, विजय पठारे, संतोष गेनप्पा, अमोल येवले, संग्राम कोतकर, अशोक दहिफळे, बबलू शिंदे, परेश लोखंडे, पारुनाथ ढोकळे, प्रशांत गायकवाड, दिपक खैरे, श्रीकांत चेमटे, शरद कोके, संदिप दातरंगे, अरुणा गोयल आदिंसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मतभेद सोडा, एकत्र या; बच्चू कडू-रवी राणा वादावर नवनीत राणांचं पहिल्यांदाच भाष्य

संभाजी कदम म्हणाले, नगरमध्ये उड्डाणपुल व्हावा, यासाठी माजी आमदार अनिल राठोड व माजी खासदार दिलीप गांधी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. यासाठी दिवंगत अनिल राठोड यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना मुंबईत तर खा.दिलीप गांधी यांनी दिल्लीतून पाठपुरावा केला. अनेक अडथळ्याची शर्यत पार करत अखेर या पुलाचे काम सुरू झाले. परंतु ज्यांच्या प्रयत्नांनी खर्‍या अर्थाने हा उड्डाणपूल झाला, ते दोन्ही जनतेतील नेते दिवंगत अनिल राठोड व माजी खासदार दिलीप गांधी हयात नाहीत. परंतु खर्‍या अर्थाने ज्यांचे योगदान यासाठी आहे, त्यांचा सोयीस्कर विसर पडला आहे. त्यामुळे आम्ही शिवसैनिकांनीच या पुलाचे उद्घाटन करुन त्यांच्या कार्याची जाणिव सर्वांना करुन देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.

याप्रसंगी विक्रम राठोड म्हणाले, राज्यात अनेक जिल्ह्यात उड्डाणपूल होत असताना नगरमध्येही पूल व्हावा, यासाठी अनिल राठोड यांनी मोठे प्रयत्न केले. ज्यावेळी राज्यात शिवसेना – भाजपची सत्ता होती, त्यावेळी नगरमध्ये आलेल्या मंत्र्यांना नगरमध्ये उड्डाणपूल होणे किती गरजेचे आहे, हे वेळोवेळी सांगून मुंबईतही त्यासाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांचेही मोठे योगदान राहिले, परंतु आता त्यांचा सध्या विसर पडला आहे. त्यामुळे आम्ही औपचारिक उद्घाटन केलं आहे, लवकरच हा पूल नागरिकांसाठी खुला होईल, असे सांगितले.

दरम्यान, यावेळी अनिल राठोड व दिलीप गांधी यांचे फोटो असलेले फलक झळकावत मोठ-मोठ्या घोषणा देत कार्यकत्यांनी पुलावरील वातावरण दणाणून सोडले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. शिवसेनेच्या वतीने आज पुलाची पाहणी होणार असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पुलावर ठिकठिकाणी मोठ-मोठे गल्डर टाकून रस्ता बंद करण्यात आला होता.

254 COMMENTS

  1. No matter if some one searches for his required thing, thus he/she desires
    to be available that in detail, thus that thing is maintained over here.

    Feel free to surf to my webpage : mp3juice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here