इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका इंटीरियर डिझायनरनं आत्महत्या केली आहे. तिच्या पतीनं घराचं सीसीटीव्ही पाहिलं. त्यात त्याला पत्नी मृतावस्थेत दिसली. पण पती दुसऱ्या शहरात होता. त्यामुळे त्याला काहीच करता आलं नाही. करुणा शर्मा असं मृत महिलेचं नाव आहे. तिच्या घरात पोलिसांना चार पानांची चिठ्ठी सापडली आहे.

करुणा यांचे पती उत्तम शर्मा भिलाईत राहतात. त्यांनी तिथून घराचं सीसीटीव्ही फुटेज पाहिलं. त्यात त्यांना करुणा गळफास लावलेल्या स्थितीत दिसल्या. उत्तम यांनी फोन करुणा यांच्या फोनवर कॉल केला. त्यानंतर लगेचच शेजाऱ्यांना कॉल केला. शेजाऱ्यांनी दार तोडून आत प्रवेश केला. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
मित्राला भेटून परतताना लिफ्ट बंद पडली; बाहेर येण्याचा प्रयत्न केला, पण सगळंच संपलं
गेल्या अनेक दिवसांपासून करुण शर्मा तणावाखाली होत्या. आपल्या ८ वर्षांच्या लेकीवर याचा परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी तिला पतीसह इंदूरहून छत्तीसगढला पाठवलं. त्या एकट्याच सगळा तणाव सहन करत होत्या. त्यांना सातत्यानं जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. करुणा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत हेमंत अत्रिवाल, त्यांची पत्नी प्रमिला अत्रिवाल, मोना शर्मा आणि आदित्य अग्रवाल यांची नावं आहेत. हे चौघेही शहरातून बेपत्ता आहेत.
हुंड्यातली कार ठरली कर्दनकाळ; नवशिक्या नवरदेवानं पाहुण्यांना उडवलं, आत्येचा मृत्यू
चिठ्ठीत काय?

रोज रोज मरण्यापेक्षा एकदाच मरणं चांगलं आहे. असे मित्र असतील तर शत्रूंची गरज काय? जे काही वाईट करायचं असेल ते तेच करतील, असं शर्मांनी चिठ्ठीत म्हटलं आहे. मला रोज मरण्याचा विचार यायचा. पण हिंमत करायचे. प्रयत्न करायचे. नव्या कामासाठी प्रयत्न करायचे. पण काहीच व्हायचं नाही. आता तणाव सहन होत नाही. सगळ्यांचे मेसेज, फोन कॉल, धमक्या यामुळे वैतागले आहे. आज मला मरावं लागतंय. यासाठी मोना शर्मा, प्रमिला अत्रिवाल, हेमंत अत्रिवाल आणि आदित्य अग्रवाल जबाबदार आहेत, असं शर्मांनी चिठ्ठीत नमूद केलं आहे.

३१ जुलैच्या रात्री १२ वाजता आदित्यनं माझ्या घरात येऊन तोडफोड केली. मला आणि माझ्या पतीला वारंवार जीवे मारण्याची धमकी दिली. अत्रिवाल पैसे न देण्याची धमकी देतो. मोनामुळे प्रमिलानं पैसे देणं कमी केलं. जुलै २०२१ पासून तर सगळेच पैसे रोखले, असं शर्मांनी चिठ्ठीत म्हटलं आहे. करुणा शर्मांवर बरंच कर्ज होतं. त्यामुळे त्या तणावाखाली होत्या. याच तणावाला कंटाळून त्यांनी जीवन संपवलं.

335 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here