नागपूर : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची कन्याकुमारीपासून सुरू झालेली ‘भारत जोडो यात्रा’ काल हैदराबाद शहरात पोहोचल्यानंतर झालेल्या गर्दीमुळे चांगलाच गोंधळ उडाला. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर राऊत यांना उपचारासाठी हैदराबादमधीलच एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे उपचार घेतल्यानंतर आज नितीन राऊत यांना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच राऊत यांनी माध्यमांशी बोलताना आपबिती सांगितली आहे.

‘आमचे नेते राहुल गांधी यांच्या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी मी हैदराबादला आलो होतो. राहुल गांधी हे शहरातील इंदिरा गांधी पुतळ्याजवळ पोहोचल्यानंतर तिथे प्रचंड गर्दी झाली. ही गर्दी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना अचानक काय झालं, माहीत नाही, परंतु ते अचानक लोकांवर तुटून पडले आणि जमलेल्या लोकांना बाजूला करायला लागले. या सगळ्या गदारोळात स्वत: एसीपी आणि इतर काही लोकांनी मला जोरात धक्का दिला आणि मी खाली कोसळलो. समोरून ढकलण्यात आल्याने माझ्या डोक्याला मार लागण्याची शक्यता होती. मात्र मी स्वत:ला सावरत उजव्या बाजूच्या रस्त्यावर पडलो. त्यावेळी माझ्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीनंतर तब्बल २२ मिनिटं डोळ्यातून रक्तस्त्राव सुरू होता. मात्र तेथील पोलीसही मदतीला आले नाहीत,’ अशा शब्दांत नितीन राऊत यांनी आपल्यासोबत घडलेली घटना सांगितली आहे.

चित्रा वाघ यांना भाजपच्या महिला मोर्चाचे अध्यक्षपद, चर्चा मात्र पंकजांच्या हुकलेल्या संधीची

‘गंभीर दुखापत झाली, मात्र डोळा वाचला’

राहुल गांधी यांच्या पदयात्रेवेळी जखमी झालेल्या नितीन राऊत यांच्या डोळ्याच्या आसपास गंभीर स्वरुपाची दुखापत झाल्याचं दिसत आहे. याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, ‘उजव्या डोळ्यावर मला जबर मार लागला आहे. आतमध्ये हेअरलाईन फ्रॅक्चर झालं आहे. मात्र माझा डोळा वाचला आहे.’

दरम्यान, मी रुग्णालयात पोहचेपर्यंत माझी विचारपूस करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, वेणुगोपाल राव, मल्लिकार्जुन खर्गे यांचा फोन आला होता. तसंच पक्षाचे अनेक पदाधिकारी मला भेटायला आले, असंही नितीन राऊत यांनी सांगितलं आहे.

241 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here