रत्नागिरी: तालुक्यातील बौद्धवाडी येथे विहिरीत पडून बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेबद्दल वन्यप्राणी प्रेमी हळहळ व्यक्त करत आहेत. ( Leopard falls into well )

वाचा:

मावळंगे गावच्या सरपंच यांनी या घटनेबाबत वन विभागाला माहिती दिली. मावळंगे बौद्धवाडी येथील अजय सखाराम जाधव यांना त्यांच्या घरा शेजारील विहिरीतून दुर्गंध येत होता म्हणून त्यांनी डोकावून पाहिले असता विहिरीत मृतावस्थेत असल्याचे दिसले.पहाटे चार वाजताच्या सुमारास ही बाब कळल्यानंतर त्यांनी लगेचच गावच्या सरपंचांना कळवले.

संरपंचांकडून माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व बिबट्याला विहिरीतून बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. यावेळी परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड, वनपाल जी. पी. कांबळे, मिथाली कुबल, एम. जी. पाटील, नाखरे गावचे पोलीस पाटील सुधीर वाळिंबे आदी उपस्थित होते.

वाचा:

बिबट्याचा होता मुक्तसंचार

साधारण दोन ते तीन दिवसांपूर्वी हा बिबट्या विहिरीत पडला असावा, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. नर जातीचा हा बिबट्या पूर्ण वाढ झालेला होता. साधारण सहा वर्षांचा हा बिबट्या असावा. गेल्या काही दिवसांत या भागात अनेक जनांनवर बिबट्याने हल्ले केले होते. अलीकडे काही दिवस बिबट्याचा कुठे वावर आढळला नव्हता. त्यामुळे या भागात दहशत पसरवणारा हाच बिबट्या असावा असा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान हा बिबट्या विहिरीत कसा पडला, याची चौकशी केली जाईल, असे प्रियंका लगड यांनी सांगितले आहे.

वाचा:

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here