बारामती : शहरातील भिगवण रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ ‘रायझिंग महाराष्ट्र’ या वृत्तपत्राचे प्रतिनिधी गणेश उर्फ आकाश जाधव यांच्यावर आज संध्याकाळच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाला. आकाश जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यामध्ये जाधव हे जखमी झाले असून त्यांच्या छातीत गोळी लागली असल्याचे समजते.

गोळीबाराची घटना घडल्यानंतर आकाश जाधव यांना उपचारार्थ शहरातील बारामती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

बेटा बायकोसोबत भांडू नकोस, वादात मध्यस्थी पित्याला भोवली, मुलाने थेट…

बारामती शहरातील अज्ञात हल्लेखोरांनीच हा हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत पोलीस माहिती घेत होते. भांडणातून थेट गोळीबाराची घटना घडल्याने शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. आकाश जाधव यांच्या प्रकृतीबाबत बारामती हॉस्पिटलचे डॉ. दीपक महाडिक यांनी माहिती दिली. जाधव यांच्या छातीला डाव्या बाजूला लागली आहे. मात्र सुदैवाने सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. महाडिक यांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांकडून आरोपींचा युद्धपातळीवर शोध घेतला जात असून आम्ही लवकरच आरोपींना ताब्यात घेऊ, असं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here