वाचा:
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष , बिल गेट्स, जेफ बेझो यांसारख्या जगप्रसिद्ध व्यक्ती तसेच उबेर व अॅपल कंपन्यांची ट्विटर अकाउंट्स हॅक केली आहेत गेली आहेत. तसेच या व्यक्ती व कंपन्यांच्या नावाचे ट्विट पाठवून काही ठराविक रक्कम इनाम म्हणून पण जाहीर करण्यात आली आहे. तसेच हॅक झालेल्या अकाउंट्स वरून काही फेक लिंक्स टाकण्यात आल्या होत्या. ज्याद्वारे सायबर भामट्यांच्या खात्यात साधारणपणे १.२ लाख डॉलर किमतीच्या बिटकॉइन्स जमा झाल्याचा अंदाज आहे. याबाबत बातम्या सर्व समाज माध्यमांवर फिरत असून हा सर्व प्रकार साधारणतः भारतीय प्रमाण वेळेनुसार १६ जुलै २०२० च्या मध्यरात्री ०१:३० वाजता घडला आहे. त्यामुळे ट्विटरचे काही फीचर्स व सुविधा ठराविक काळाकरिता उपलब्ध नव्हत्या. ट्विटर सपोर्ट्सने सदर प्रकार ओळखून या बाबत योग्य उपाययोजना व तांत्रिक खबरदारी घेऊन सदर प्रकार वेळीच थांबवला असला तरी या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मागोवा घेऊन महाराष्ट्र सायबरने या संदर्भात ट्विटर इंडियाला लगेच सूचना दिल्या आहेत.
वाचा:
भारतातील सर्व नागरिकांच्या, महत्त्वाच्या व्यक्तींचे व संस्थांचे अधिकृत (व्हेरिफाइड) ट्विटर अकाउंट्स व त्या अकाउंट्समधील सर्व डेटा व त्या अकाऊंटची प्रायव्हसीची काळजी घ्यावी व त्याकरिता त्यांनी आवश्यक ते तांत्रिक बदल आपल्या सायबर सुरक्षा प्रणालीमध्ये करून घ्यावे. करोना महामारीच्या काळात आधीच तणावपूर्ण वातावरण असताना अधिक काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही अकाउंट वरून काही चुकीची माहिती प्रसारित झाली तर त्यामुळे राज्यात गोंधळ पसरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे सांगत महाराष्ट्र सायबरने ट्विटर इंडियाला सावध केले आहे.
माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० कलम ७९ (३) ( ब) अन्वये भारतातील सर्व ट्विटर अकाउंट्सच्या सुरक्षिततेची जवाबदारी ही ट्विटर इंडियाची आहे, असेही महाराष्ट्र सायबरने ट्विटर इंडियाला लक्षात आणून दिले आहे. महाराष्ट्र सायबरने अशाच प्रकारच्या माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० कलम ७९(३) (बी) अन्वये , व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम व अन्य सोशल माध्यमांना नोटीस पाठवून नागरिकांच्या प्रोफाइल व डेटा व प्रायव्हसीची सुरक्षा राखण्याबाबत सांगितले आहे.
वाचा:
महाराष्ट्र सायबरचे नागरिकांना आवाहन
१) आपल्या ट्विटर व अन्य सोशल मीडिया अकाउंट्सचा पासवर्ड नियमितपणे बदलत राहा.
२) ट्विटरवर येणाऱ्या व कोणत्याही सेलिब्रिटी किंवा व्हेरिफाइड अकाउंटने एखादी बातमी ट्विट केली तर आंधळेपणाने ती रीट्विट करू नका. आधी सदर बातमीची खातरजमा करून घ्या.
३) कोणत्याही सेलिब्रिटी किंवा व्हेरिफाइड अकाउंटवरून जर काही मेसेज किंवा काही पैसे मिळतील, अशा संदर्भात कोणती स्कीम किंवा ऑफर आल्या तर त्यावर विश्वास ठेवून क्लिक करू नका.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times