मृत राजमणी यांच्यावर बऱ्याच कालावधीपासून उपचार सुरू होते. यामुळे मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्या केली असावी अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केलीय. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना आज सकाळी बाथरूममधील खिडकीतील लोखंडी गजाला अडकून कपड्याने गळफास घेऊन रुग्णाने आत्महत्या केलेच्या दिसून आले. त्यानंतर ही घटना समोर आली, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले.
कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी रुग्णाचा मृतदेह उतरवला. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हा प्रकार हत्येचा वाटत नाही, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दिल्लीतील एम्समध्ये अशाच प्रकरची घटना ११ जुलैला घडली होती. एम्समध्ये काम करणाऱ्या मनोचिकित्सक आत्महत्या केली होती. निवासी डॉक्टरने वसतिगृहाच्या १० व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांचं नाव डॉ. अनुराग कुमार असं होतं. कुमार यांनी आत्महत्येपूर्वी कुठलीही चिठ्ठी लिहिली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. गेल्या शनिवारी संध्याकाळी ५ वाजता ही घटना घडली. डॉक्टरांचा फोन वसतिगृहाच्या १०व्या मजल्यावर पोलिसांना आढळून आळा, अशी माहिती पोलीस उपायुक्त अतुल कुमार ठाकूर यांनी दिली.
डॉ. कुमार हे मानसिक तणावाखाली होते. आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टर कुमार यांनी आपला जीवन प्रवास एका ब्लॉगच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडला होता. हा ब्लॉग २१ जूनला पोस्ट करण्यात आला होता. प्रशिक्षणार्थी मनोचिकत्सकाचा तणावाशी संघर्ष, असं या ब्लॉगचं शिर्षक होतं, अशी माहिती विभागाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times