पुणे: आणि जिल्ह्यातील करोना बाधितांच्या संख्येने एकाच दिवशी दोन हजारांचा आकडा पार केला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४५ हजारांपर्यंत येऊन पोहोचली आहे. गुरुवारी ७६४ रुग्णांना बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले असून, गंभीर रुग्णांपैकी ४५६ रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.

वाचा:

पुण्यात गुरुवारी १२१० बाधित आढळले. पिंपरी-चिंचवडमध्येही नव्याने ५३४ रुग्ण आढळले. त्यामुळे पुण्यासह पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात संसर्ग वाढत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुण्यात गुरुवारी प्रयोगशाळा आणि अँटिजेन चाचण्या मिळून सुमारे साडेसहा हजार चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली आहे. शहरात ५३६ रुग्ण गंभीर आहेत. पैकी ८० रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. शहरात सक्रिय रुग्णांची संख्या दहा हजार ६४४ झाली आहे. याशिवाय बरे झालेल्या रुग्णांचा आकडा वीस हजार ३३४वर गेला आहे. शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी ३८ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या १२१८वर पोहोचली आहे. मृतांमध्ये पुण्यातील १७, ग्रामीण भागातील चार आणि पिंपरी-चिंचवडमधील १४ जणांचा समावेश आहे. नगरपालिका तसेच, खडकी कँटोन्मेंट बोर्डात तीन जणांचा मृत्यू झाला.

पुण्यातील गुरुवारची स्थिती

पालिका नवीन रुग्ण १२१०
पिंपरी-चिंचवड नवीन रुग्ण ५३४
पुणे कँटोन्मेंट नवीन रुग्ण १२९
पुणे ग्रामीण नवीन रुग्ण २५९
गुरुवारी बरे झालेले रुग्ण ७६४
गुरुवारचे मृत्यू ३८

एकूण पॉझिटिव्ह : ४४,९६८ (पुणे शहर : ३०,७५४, पिंपरी-चिंचवड : ९,३८७, पुणे ग्रामीण : २,८५६, पुणे कँटोन्मेंट आणि जिल्हा रुग्णालय : १९७१)

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here