छत्तीसगड : छत्तीसगडमधील एका विचित्र घटनेमध्ये आठ वर्षाच्या मुलाने कोब्रा सापाचा चावा घेतल्याने सापाचा मृत्यू झाला आहे. जसपूर जिल्ह्यामधील पंढरपेढ या दुर्गम भागातील गावामध्ये या मुलाच्या हाताला सापाने विळखा घातला. त्यानंतर या मुलाने सापापासून सुटका करुन घेण्यासाठी सापाचा चावा घेतला. ज्यात सापाचाच मृत्यू झाला.

दिपक नावाचा हा मुलगा त्याच्या घरामागील अंगणामध्ये खेळत असताना त्याला विषारी कोब्रा सापाने चावा घेतला. ‘सापाने माझ्या हाताला विळखा मारला आणि हाताचा चावा घेतला. मी हात झटकून सापाला दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काही फायदा झाला नाही. त्यामुळे मी दोन वेळा सापाला चावलो,’ असं दिपकने स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितल्याचे न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे.

Andheri Bypoll: अंधेरी पोटनिवडणुकीत फक्त ८५,६९८ मतं, ऋतुजा लटकेंना निर्भेळ विजयासाठी किती मतं आवश्यक?
या घटनेनंतर दिपकला जवळच्या आरोग्य केंद्रावर नेण्यात आलं. त्याला सापाचं विष उतरवणारं औषध देण्यात आलं आणि दिवसभर देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं, असं या आरोग्य केंद्रातील डॉक्टर जेम्स मिनीज यांनी सांगितलं. दिपकला विषबाधा झाल्याची कोणतीही लक्षणं दिसत नव्हते. त्याला साप चावला तरी त्याच्या शरीरामध्ये विष पसरलं नव्हतं. अशा पद्धतीने साप चावणे फार वेदनादायी असतं. यामध्ये फक्त ज्या ठिकाणी साप चावला आहे तिथेच वेदना होतात, अशी माहिती सर्पतज्ज्ञ कासीन हुसैन यांनी दिली.

बाजारात किंचित वाढ, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कोणत्या स्टॉक्समध्ये तेजी; जाणून घ्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here