Maharashtra Politics | मुंबईत झालेल्या स्वागतासाठी मी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो. मुंबई हे भारतातील प्रमुख शहर आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. दोन वर्षांपेक्षा अधिक काळ मुंबई आणि राज्याला ग्रहण लागले होते. मात्र, आता हे ग्रहण सुटले आहे. आज मोदीजी आणि शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राचा विकास वेगाने होत आहे, असा दावा तेजस्वी सूर्या (Tejasvi Surya) यांनी केला.

हायलाइट्स:
- महाराष्ट्राला लागलेले ग्रहण सुटले आहे
- भाजपचा राष्ट्रीय पातळीवरील ग्लॅमरस युवा चेहरा असलेला खासदार
खासदार तेजस्वी सूर्या हे आज आदित्य ठाकरे यांच्या वरळीत मतदारसंघात जाणार आहेत. याठिकाणी तेजस्वी सूर्या यांच्या हस्ते भाजपच्या युवा योद्धा शाखेचे उद्घाटन केले जाईल. त्यामुळे आज वरळीत भाजप युवा मोर्चाकडून मोठ्याप्रमाणावर शक्तीप्रदर्शन पाहायला मिळेल. तेजस्वी सूर्या यांचे मुंबईत आगमन झाल्यानंतर भाजप युवा मोर्चाकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी तेजस्वी सूर्या यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुंबईत झालेल्या स्वागतासाठी मी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो. मुंबई हे भारतातील प्रमुख शहर आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. दोन वर्षांपेक्षा अधिक काळ मुंबई आणि राज्याला ग्रहण लागले होते. मात्र, आता हे ग्रहण सुटले आहे. आज मोदीजी आणि शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राचा विकास वेगाने होत आहे. पंतप्रधान मोदींचं सबका साथ, सबका विकास हे धोरण पुढे नेण्यासाठी आणि भाजपच्या युवा मोर्चाला बळकटी देण्यासाठी मी वरळीत आलो आहे, असे तेजस्वी सूर्या यांनी म्हटले. त्यामुळे आता आगामी काळात मुंबईत भाजप युवा मोर्चा आणि युवासेनेत राजकीय द्वंद्व रंगण्याची शक्यता आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.