नवी दिल्ली: जर तुम्ही जुने घर विकून नवीन खरेदी करत असाल तर तुम्हाला आयकराचे (Income Tax) नियम माहित असणे आवश्यक आहे. विक्री आणि खरेदी हा एक मोठा व्यवहार आहे आणि यामध्ये तुमचे उत्पन्नही वाढते. त्यामुळे तुमचा कर कक्षही वाढू शकतो. त्या वाढलेल्या व्याप्तीनुसार तुम्ही कर भरला नाही, तर प्राप्तिकर विभाग तुमच्यावर कारवाई करू शकतो. त्यामुळे जुने घर विकून तुम्ही नवीन खरेदी करत असाल, तर पुढे काय करायचे याबाबत कर तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या. याच्या संबंधित आणखी एक प्रश्न आहे की वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेवर आयकर कायदा काय सांगतो? याच्या विक्रीवर कोणता कर नियम लागू होईल आणि तुम्ही करबचत कसे करू शकता.

IT कर्मचाऱ्यांनो सावध व्हा! एकाचवेळी गुपचूप दोन ठिकाणी जॉब करताय; इन्कम टॅक्स विभागाने दिलाय इशारा
सर्व प्रथम, वारसा हक्काने मिळालेल्या मालमत्तेबद्दल बोलूया. जेव्हा आपल्याला वारसा हक्काने मालमत्ता मिळते, तेव्हा ती घेताना त्यावर कोणताही कर लागत नाही आणि त्यावर आयकराचा कोणताही नियम लागू पडत नाही. मात्र, काही राज्य सरकार अशा मालमत्तांच्या कागदपत्रांसाठी शुल्क आकारते. पण त्याचा कराशी काहीही संबंध नाही. अशी मालमत्ता पूर्णपणे कराच्या पलीकडे आहे.

घरबसल्या जिंका तगडी बक्षीसे! करचोरी करणाऱ्यांची मालमत्ता पकडून द्या, ‘इथं’ करा तक्रार
मालमत्तेच्या विक्रीवर कोणते कर
मालमत्तेच्या विक्रीवर अनेक प्रकारचे कर भरावे लागतात. केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांकडून मालमत्तेच्या विक्रीवर विविध प्रकारचे कर आकारले जातात. यातील काही कर खरेदीदाराला भरावे लागतात, तर काही कर विक्रेत्याला भरावे लागतात.

आयकरचा नवा नियम; काय आहे इन्कम टॅक्स संबंधित नियम १३२, पाहा करदात्यांसाठी का महत्त्वाचा
वारशाने मिळालेल्या मालमत्तेवर कर
एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेतून, जसे की भाड्याने मिळणारे उत्पन्न असल्यास, त्या उत्पन्नावर कर आकारला जाईल का? याचे उत्तर म्हणजे जर तुमच्याकडे अशी मालमत्ता असेल ज्यातून उत्पन्न मिळत असेल तर ते उत्पन्न तुमचेच मानले जाईल. त्यानंतर तुम्हाला त्या उत्पन्नावर कर भरावा लागेल. त्याचप्रमाणे, जर तुम्हाला भेट म्हणून शेअर किंवा मुदत ठेवी मिळाली असेल, तर तुम्हाला त्यावरील कमाईवरही कर भरावा लागेल.

भांडवली नफ्यावर कर गणना
दरम्यान, जर तुम्ही वारसा मिळालेली मालमत्ता विकत असाल तर त्यावर दीर्घकालीन किंवा अल्प मुदतीच्या आधारावर कर लावण्याची तरतूद आहे. याला भांडवली नफा कर म्हणतात. मालमत्तेच्या विक्रीवर भांडवली नफ्याच्या आधारावर कर मोजला जातो आणि त्या आधारावर कर जोडला जातो. पण यावर कर वाचवण्याची देखील तरतूद आहे, ज्यामध्ये काही अटी लक्षात घेऊन भांडवली नफ्यावर कर वाचवता येतो. समजा तुम्ही वारसा हक्काने मिळालेले घर विकले असेल आणि त्यावर भांडवली नफा झाला असेल, तर त्यावर कर वाचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे विक्रीच्या पैशातून नवीन घर घेणे.

आयटीआरमध्ये कमाई दाखवणे आवश्यक
दुसरीकडे, वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता विकून मिळालेले उत्पन्न आयकर विवरणपत्रात दाखवले नाही तर काय होईल हा आणखी एक प्रश्न आहे. प्राप्तिकर विवरण पात्रात कर दाखवले नाही तर विभाग काही कारवाई करू शकतो का? कोणत्याही मालमत्तेच्या विक्रीवर भांडवली नफा झाला असेल तर तो प्राप्तिकर विवरणपत्रात दाखवणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कर विभाग तुमच्यावर कारवाई करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here