Haji Ali dargah attack | संबधित फोन हा उल्हासनगरहून आला असल्याचे तपासात समोर आले असून पोलिस फोन करणाऱ्या इसमाचा शोध घेत आहेत. धमकीचा फोन काल (३ नोव्हेंबर २०२२) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आला होता. तेव्हापासून पोलिसांचा तपास सुरु आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीविषयी अद्याप पोलिसांच्या हाती कोणतीही ठोस माहिती लागलेली नाही.

 

Haji Ali Dargah
हाजीअली दर्गा

हायलाइट्स:

  • प्रशासन आणि सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत
  • पोलिसांनी हाजी अली दर्ग्याच्या आजूबाजूचा परिसर, एल अँड टीच्या प्रोजेक्ट साइट हा सर्व भाग पिंजून काढला
मुंबई: शहरातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये हा धमकीचा फोन आला होता. हा फोन उल्हासनगरमधून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फोनवरील व्यक्तीने, मुंबईत १७ दहशतवादी येणार असल्याचे सांगितले. हे दहशतवादी हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा दावा फोनवरील व्यक्तीने केला.

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आलेल्या या फोननंतर प्रशासन आणि सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या फोननंतर पोलिसांनी हाजी अली दर्ग्याच्या आजूबाजूचा परिसर, एल अँड टीच्या प्रोजेक्ट साइट हा सर्व भाग पिंजून काढला. मात्र, पोलिसांनी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही.
४ ठिकाणी बॉम्ब ठेवलेत ५ कोटी दे नाहीतर…; ललित हॉटेल धमकी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई
ज्या नंबरवरून फोन आला होता. त्या नंबरवर पुन्हा फोन केला असता तो बंद असल्याचे आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. संबधित फोन हा उल्हासनगरहून आला असल्याचे तपासात समोर आले असून पोलिस फोन करणाऱ्या इसमाचा शोध घेत आहेत. धमकीचा फोन काल (३ नोव्हेंबर २०२२) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आला होता. तेव्हापासून पोलिसांचा तपास सुरु आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीविषयी अद्याप पोलिसांच्या हाती कोणतीही ठोस माहिती लागलेली नाही.

मुंबईतील कॉम्प्युटर इंजिनिअरला जन्मठेपेची शिक्षा

आठ वर्षांपूर्वी वांद्रे-कुर्ला संकुलातील परदेशी नागरिकांच्या लहान मुलांचाही समावेश असलेल्या ‘अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे’मध्ये दहशतवादी हल्ला घडवून घातपात करण्याच्या कटात सहभागी झाल्याबद्दल कुर्ला नेहरू नगर येथील संगणक अभियंता अनीस अन्सारी याला मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. ए. जोगळेकर यांनी नुकतेच दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here