Pune Crime News : व्यावसायिकाचे अपहरण करुन २० कोटीची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात फरार असलेला फरार असलेला गज्या मारणे टोळीतील सराईत गुन्हेगार रुपेश मारणे (Rupesh Marne) याला अटक करण्यात आली. गुंड गज्या मारणे याच्या टोळीतील तो कुख्यात गुंड आहे.

दुसऱ्या एका प्रकरणात एका व्यावसायिकाने बांधकाम व्यवसायासाठी १ कोटी ८५ लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्या बदल्यात २ कोटी ३० लाख रुपये परत दिले होते. तरीही आणखी ६५ लाखांची मागणी करुन व्यावसायिकाला धमकाविले जात होते. याप्रकरणी रुपेश मारणेसह चौघांवर नुकताच गुन्हा दाखल झाला होता. या दोन्ही गुन्ह्यात रुपेश मारणेचा शोध सुरु होता.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.