मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडत एकनाथ शिंदेंनी ठाकरे सरकार पाडलं. शिवसेनेचे ४० आणि छोटे पक्ष, अपक्षांना धरून एकूण ५० आमदारांच्या मदतीनं शिंदेंनी भाजपसह सरकार स्थापन केलं. शिंदे मुख्यमंत्री होऊन आता ४ महिने पूर्ण झाले आहेत. शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत दोन गट पडले. बहुतांश आमदार, खासदार शिंदेंसोबत गेले. तर काही आमदार आणि खासदार अद्यापही उद्धव ठाकरेंसोबत आहेत. यामुळे शिवसेनेचं भवितव्य काय, राज्यातला एक प्रमुख पक्ष असलेल्या पक्षाचं भविष्य काय, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला शिंदेंनी उत्तर दिलं.

शिवसेना सध्या दोन गटात विभागली गेली आहे. ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांचा शिवसेनेवर दावा आहे. शिवसेना आमचीच असं दोन्ही गटातले नेते सांगतात. भविष्यात दोन्ही गट एकत्र येऊ शकतात का, असा प्रश्न शिंदेंना विचारण्यात आला. त्यावर इथे जर-तरचा मुद्दा नाही. आता इथे आमचं सरकार आहे. युती म्हणून आम्ही काम करत आहोते. आता आम्ही एकटे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेनुसार काम करत आहेत. त्याच विचारांनी पुढे जात आहोत, असं शिंदे म्हणाले. ते मुंबईत आयोजित इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते.
Sushma Andhare : ठाकरे गटाला धक्का, मुक्ताईनगरातील सुषमा अंधारेंच्या सभेवर बंदी; पोलिसांनी स्टेजही हटवले
बाळासाहेबांची शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांनुसार चालते. आम्ही त्यांच्या विचारांचे उत्तराधिकारी आहोत. बाळासाहेबांच्या महत्त्वाकांक्षा पंतप्रधान मोदी पूर्ण करत आहेत. मला एक दिवस पंतप्रधान करा. मी काश्मीरमधून कलम ३७० हटवेन. अयोध्येत राम मंदिराची उभारणी करेन, असं बाळासाहेब म्हणाले होते. मोदींच्या नेतृत्त्वाखालील सरकारनं या दोन्ही गोष्टी केल्याचं म्हणत शिंदेंनी केंद्र सरकारचं कौतुक केलं.

मी एकदा कमिटमेंट दिली की मागे हटत नाही. एका चित्रपटात हा डायलॉग आहे. आम्ही आमच्या कमिटमेंटपासून मागे हटणार नाही. त्यासाठी कोणतंही पाऊल उचलावं लागलं तरी चालेल. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहोत. ज्यांना सोबत यायचं आहे ते येऊ शकतात, असं शिंदे म्हणाले. आम्हीच खरी शिवसेना आहोत. कारण आम्ही त्यांचे विचार पुढे घेऊन जात आहोत, याचाही पुनरुच्चार त्यांनी केला.
Tejasvi Surya: आदित्य ठाकरेंच्या वरळीत भाजपच्या तरुण तडफदार खासदाराची एन्ट्री, युवा योद्धा शाखेचा शुभारंभ
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार, असा प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला. त्यावर थेट आणि नेमकं उत्तर देणं शिंदेंनी टाळलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा सगळ्यांना पाहिला आहे. मी एक लहान कार्यकर्ता आहे. आता मला संधी मिळाली आहे. त्याचा वापर करेन. जनतेच्या विकासासाठी काम करेन. शेतकऱ्यांला लाभ मिळेन यासाठी प्रयत्न करेन, असं उत्तर शिंदेंनी दिलं.

मी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार की नाही ते राज्यातील जनता ठरवेल. चांगलं काम करणं माझ्या हातात आहे. मात्र मुख्यमंत्री कोणाला करायचं ते जनता ठरवेल, असं मोघम उत्तर त्यांनी दिलं. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार यावर नेमकं उत्तर शिंदेंनी दिलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here