कन्नूर: कारला टेकून उभा राहिल्यामुळे तरुणानं सहा वर्षांच्या मुलाला लाथ मारणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. कारला टेकून उभा असल्यानं तरुणानं स्थलांतरित मजुराच्या मुलाला मारहाण केली होती. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. केरळच्या कन्नूरमध्ये ही घटना घडली.

व्हायरल व्हिडीओची दखल घेऊन पोलिसांनी तरुणाला अटक केली. शिहशाद असं तरुणाचं नाव असून तो थलासेरीजवळच्या पोन्निमचा रहिवासी आहे. शिहशादनं लाथ मारलेला मुलगा अल्पवयीन आहे. त्याचे वडील राजस्थानहून मजुरीसाठी केरळमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी शिहशादवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
‘तेरी बहुत याद आती है…’ सोशल मीडियावर पोस्ट टाकली, रात्रभर रडला अन् टोकाचं पाऊल उचललं
सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण कारच्या दिशेनं चालताना दिसतो. कारच्या मागच्या बाजूला टेकून उभ्या असलेल्या एका मुलाच्या छातीत तो लाथ मारतो. या घटनेनंतर आसपासचे लोक शिहशादला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतात. मात्र शिहशाद कारमध्ये बसून तिथून निघून जातो.

पोलिसांना या घटनेची कल्पना होती. मात्र घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतरच पोलिसांनी शिहशादला अटक करण्यात आल्याचा आरोप होत आहे. शिहशादनं मारहाण केलेल्या मुलाला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
असे मित्र असल्यास शत्रूंची काय गरज? इंटीरियर डिझायनरनं जीवन संपवलं; पतीनं CCTVत पाहिलं अन्…
लहान मुलाला झालेल्या मारहाणीची घटना गंभीर असल्याचं केरळच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या. ‘सामाजिक कल्याण विभागाच्या संचालकांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तरुणाच्या हल्ल्यात लहान मुलगा जबर जखमी झाला. त्याचं कुटुंब उदरनिर्वाहासाठी राजस्थानहून केरळळा आलं आहे,’ असं जॉर्ज यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here