Maharashtra Politics | महाराष्ट्रात घडलं आहे तो प्रकार एका माणसाच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे झाला आहे. आम्हाला जे सोडून गेले ते त्यांच्या स्वार्थासाठी गेले. या कार्यक्रमात शिंदे गटाच्या आमदारांना पुन्हा एकदा गद्दार म्हणून हिणवले. शिंदे गटाच्या आमदारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे. राज्यातील जनता ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाजूने आहे.

हायलाइट्स:
- देवेंद्र फडणवीस यांची बदनामी होत आहे
- ते या सरकारमध्ये राहूच कसे शकतात, याचे मला आश्चर्य वाटते
यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. महाराष्ट्रात घडलं आहे तो प्रकार एका माणसाच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे झाला आहे. आम्हाला जे सोडून गेले ते त्यांच्या स्वार्थासाठी गेले. या कार्यक्रमात शिंदे गटाच्या आमदारांना पुन्हा एकदा गद्दार म्हणून हिणवले. शिंदे गटाच्या आमदारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे. राज्यातील जनता ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाजूने आहे. गद्दारांनी जनादेशाचा अनादर केला. मी रोज किंवा जवळपास एक दिवसाआड हे आव्हान देत असतो. मात्र ते स्वीकारत नाहीत. मला पूर्ण राज्यात मध्यावधी निवडणूक व्हावी असे वाटत नाही. केवळ ४० जागांवर निवडणूक व्हावी, या मताचा मी असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेले अडीच वर्षांचे वचन पाळले असते तर आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी बसले असते. आज ते उपमुख्यमंत्रीपदी बसले आहेत. मात्र मी त्यांच्या जागी असतो तर राजीनामा दिला असता आणि अशा सरकारमध्ये मी राहिलो नसतो नव्याने निवडणुका घेतल्या असत्या, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
पंतप्रधान मोदींशी जुळवून घेण्याचे संकेत?
या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे पंतप्रधान मोदी यांच्यावरही टीका करणे टाळले. पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांचे चांगले संबंध असल्याकडे आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. २०२१ मध्ये दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत पुन्हा जाण्याचे संकेत दिले होते, याविषयी आदित्य ठाकरे यांना विचारणा करण्यात आली. त्यावर आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी यांच्याशी आमचे कोणतेही वैर नाही. तुम्ही प्रत्येक भेटीकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहू नका. उद्धव ठाकरे हे दिल्लीत गेले, त्यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा जरुर केली. पण ती भेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून होती. आम्ही पंतप्रधान मोदी यांच्याविषयी कधीही अपशब्द उच्चारलेले नाहीत. आम्ही त्यांचा सन्मान करतो, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.