शिवानी बावकर हिने फेसबुकवरुन या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. तसंच यावेळी आदित्य ठाकरेंच्या भेटीचा योग आल्याचा आनंदही व्यक्त केला आहे.

शिवानी बावकर-आदित्य ठाकरे
शिवानीची फेसबुक पोस्ट काय?
“श्री. अभिषेक घोसाळकर आणि परिवार आयोजित “द रिवर फेस्टिवल २०२२” ला मला आमंत्रित केल्याबद्दल विनय सर तुमचे खूप खूप आभार. अतिशय उत्तम संयोजन आणि बहारदार कार्यक्रम. या प्रसंगी माननीय श्री आदित्यजी ठाकरे तसेच गायिका वैशाली सामंत यांना भेटण्याचा योग आला.” अशा भावना शिवानीने व्यक्त केल्या आहेत.
कोण आहे शिवानी बावकर?
अभिनेत्री शिवानी बावकर हिने झी मराठी वाहिनीवरील ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं होतं. तिने साकारलेली शितली आजही प्रेक्षकांना लक्षात आहे. शितली-अज्याच्या जोडीला प्रेक्षकांची वाहवा मिळाली होती. त्यानंतर अल्टी पलटी सुमडीत कल्टी या मालिकेती ती झळकली. सोनी मराठीवरील ‘तुमच्या आमच्यातील कुसूम’ या मालिकेतही तिने लक्ष वेधून घेतलं. याशिवाय उंडगा, यूथट्यूब, गुल्हर यासारख्या चित्रपटांतही तिने भूमिका साकारल्या आहेत.
हेही वाचा : सोलापुरात राष्ट्रवादीला खिंडार, तानाजी सावंतांच्या उपस्थितीत महिला नेत्या शिंदे गटात
शिवानी बावकर सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. फेसबुक, इन्स्टाग्रामवर तिचे अनेक चाहते आहेत. इन्स्टावर तिचे साडेसात लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. शिवानी स्टोरीजच्या माध्यमातून कायम फॅन्सच्या संपर्कात असते. तसंच तिच्या पोस्टवरही नेटिझन्सच्या उड्या पडत असतात.
हेही वाचा : उद्धवजींना भाजपशी जुळवून घ्यायला सांगितलं, पण साहेब म्हणाले… एकनाथ शिंदेंनी सांगितला किस्सा