T 20 World Cup : झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात पाऊस पडला तरी चालेल, पण ही एक गोष्ट घडली तर भारताचा खेळ खल्लास होऊ शकतो असे आता समोर आले आहे. टी – २० विश्वचषकाचे समीकरण हे आता समोर आले आहे. या लढतीत पाऊस पडला तर काय होऊ शकते हे देखील आता स्पष्ट झाले आहे, सेमी फायनलचे समीकरण काय आहे जाणून घ्या…

भारताला या सामन्यात पाऊस पडला तरी चालेल, पण एक गोष्ट जर घडली तर त्यांचे आव्हान संपुष्टात येणार आहे आणि ती गोष्ट म्हणजे पराभव. जर भारताचा या सामन्यात पराभव झाला तर त्यांचे सहाच गुण राहतील आणि त्यांना रनरेट तर कमीच आहे. या परिस्थितीत जर पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांनी जर आपले अखेरचे सामने जिंकले तर ते सेमी फायनलमध्ये पोहोचू शकतात व भारताचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे आता भारताचे आव्हान या विश्वचषकात टिकणार की नाही ही गोष्ट झिम्बाब्वेच्या सामन्यार अवलंबून असेल. त्यामुळे हा सामना भारताने जिंकला तर या सर्व गोष्टीचा विचारच टीम इंडियाच्या चाहत्यांना करावा लागणार नाही. त्यामुळे झिम्बाब्वेवर भारताने विजय साकारला तर ते सहजपणे सेमी फायनलमध्ये पोहोचू शकतात.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.