जोधपूर: राजस्थानच्या जोधपूरमध्ये नर्सिंगचं प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत सापडला. गळफास लावलेल्या अवस्थेत विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच खांडा फलसा पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. विद्यार्थिनी उमेद रुग्णालयात नर्सिंगचं प्रशिक्षण घेत होती.

पावटा येथील एका हॉटेलच्या खोलीत तरुणीचा मृतदेह आढळून आला. सुमन बिश्नोई नावाच्या विद्यार्थिनीचे नातेवाईक आज सकाळी खांडा फलसा पोलीस ठाण्यात पोहोचले. दोन दिवसांपासून मुलीशी संपर्क होत नसल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं, अशी माहिती एसीपी लाभुराम चौधरी यांनी दिली. पोलिसांनी तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर तपासाला सुरुवात झाली. सुमन दोन दिवसांपासून उमेद प्रशिक्षण केंद्रात जात नसल्याचं पोलिसांना तपासादरम्यान समजलं.
डोळे फोडले, हात-पाय तोडले; तरुणासोबत भयंकर प्रकार; बेपत्ता मुलगा घरी परतताच कुटुंबीय सुन्न
सुमनच्या नातेवाईकांनी शहरातील हॉटेलांमध्ये शोध सुरू केला. पावटा येथील ब्लॅक बुलमध्ये सुमन थांबल्याची माहिती त्यांना समजली. मात्र तिथली सुमनची खोली बंद होती. पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी दरवाजा उघडला. तिथे सुमनचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत सापडला. प्रथमदर्शनी सुमननं आत्महत्या केल्याचं वाटत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. कोणत्या परिस्थितीत सुमननं आत्महत्या केली याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. २ नोव्हेंबरला सुमन हॉटेलमध्ये आली. ती खूप कमी वेळा खोलीच्या बाहेर निघाल्याचं हॉटेल व्यवस्थापकानं पोलिसांना सांगितलं.
ब्युटी पार्लर, नोकरी, अपमान अन् तीन खून; पती, पत्नी आणि मोलकरणीच्या हत्येचं गूढ उकललं
एक दिवसआधी दोन तरुण सुमनला भेटायला आले होते. ते बराच वेळ तिच्या खोलीत थांबले. ते गेल्यानंतर सुमन खोलीबाहेर पडली नाही, असं हॉटेल व्यवस्थापकानं सांगितलं. तरुणीला आराम करू द्या. तिला कोणीही डिस्टर्ब करू नका, असं सांगून तरुण निघून गेल्याची माहिती त्यानं दिली. यानंतर सुमननं दार उघडलं नाही. शुक्रवारी तिचे नातेवाईक पोहोचले. त्यावेळी तिचा मृत्यू झाल्याचं कळल्याचं व्यवस्थापक म्हणाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here