बुलढाणा : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. चिखली-साकेगाव रस्त्यावरील अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजजवळ काल ३ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. धीरज विजय अंभोरे (२१, रा. अंत्री कोळी, ता. चिखली) असं अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
दरम्यान, अपघातानंतर दुचाकीला धडक देणाऱ्या वाहनासह चालक घटनास्थळावरून पसार झाला. मृत धीरजच्या पश्चात आई, वडील आणि दोन मोठे भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी अधिक तपास चिखली पोलीस करत आहेत.