T 20 World Cup : सर्व चाहत्यांना आता सेमी फायनलमध्ये कोण पोहोचणार, याची उत्सुकता लागलेली आहे. विश्वचषकचा ज्वर चांगलाच चढलेला आहे. पण एका गोष्टीने आता सर्वांनाच धक्का बसला आहे. जबरदस्त कामगिरी करूनही आता एका संघाच्या कर्णधाराने आपला राजीनामा दिला आहे. हा कर्णधार आणि त्यांचा संघ आहे तरी कोणता, जाणून घ्या…

आज विश्वचषकात ही गोष्ट पाहायला मिळाली. विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये कोण पोहोचणार, हे आज समजणार होते. त्यासाठी यजमान ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांचा सामना सुरु होता. ऑस्ट्रेलियाने धडाकेबाज फटकेबाजी करत यावेळी १६८ धावांचे आव्हान अफगाणिस्तानपुढे ठेवले. या आव्हानाचा दमदार पाठलाग अफगाणिस्तानच्या संघाने केला. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने चांगली फलंदाजी केली. अफगाणिस्तानला हा सामना फक्त तीन धावांनीच गमवावा लागल. पण या संघानंतर कर्णधाराने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशचा सामना संपल्यावर ही गोष्ट घडली. अफगाणिस्तानने सामना गमावला असली तरी ऑस्ट्रेलियाचा सेमी फायनलचा मार्ग जवळपास बंद केला आहे. पण त्यानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने मात्र आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यापुढे आता नबी अफगाणिस्तानचा कर्णधार राहणार नाही. त्यामुळे आता त्यांना नवीन कर्णधार कोण असेल, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. सध्याचा फॉर्म पाहता त्यांच्या संघाचे नेतृत्व हे रशिद खानकडे देण्यात येऊ शकते. कारण त्यांच्या संघात हा एकमेव खेळाडू असा आहे की ज्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सर्वात दांडगा अनुभव आहे. त्याचबरोबर जगभरातील क्रिकेट लीगमध्ये तो खेळलेला आहे. त्यामुळे त्याच्याकडे सध्याच्या घडीला क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे आता नबीनंतर रशिद त्यांचा कर्णधार होऊ शकतो. दुसरीकडे अफगाणिस्तानचा या विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यानंतर आता अफगाणिस्तानच्या कर्णधाराने आपला राजीनामा दिला आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.