वाचा :
जागतिक बाजारात गुरुवारी सोन्याने नवा विक्रमी स्तर गाठला. अमेरिका आणि चीनमधील संघर्ष आणि करोनाचा कहर यामुळे सोने झळाळून निघाले. स्पॉट गोल्डच्या ५ डॉलरने वधारून १८१७.७१ डॉलर प्रती औंसपर्यंत गेले होते.सप्टेंबर २०११ नंतरचा हा सर्वाधिक दर आहे. त्यातनंर सोन्यामध्ये नफा वसुली झाली. सोने ०.१ टक्क्यांनी घसरून १८०९.६२ डॉलरवर बंद झाले. यूएस गोल्डचा भाव १८१३.४० डॉलरवर स्थिर होता.
सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या दरात घसरण झाली. तर चांदीचा भाव वधारला.काल सोने ३७ रुपयांनी स्वस्त झाले आणि भाव ४९२२२ रुपये झाला. चांदी मात्र २५१ रुपयांनी वधारली आणि चांदीचा भाव किलोला ५२९०० रुपये झाला. देशातील करोना बाधितांची संख्या ९ लाखांवर गेली आहे. तर आतापर्यन्त २४ हजार नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार गुरुवारी दिल्लीत सोने ११४ रुपयांनी स्वस्त झाले. सोन्याचा भाव १० ग्रॅमला ४९९९६ रुपये झाला. चांदीच्या दरात देखील १४० रुपयांची घट झाली आणि भाव ५३४२७ रुपये झाला.
goodreturns.in या वेबसाईटनुसार आज शुक्रवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७५०० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ४८५०० रुपये झाला आहे. त्यात ४०० रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीचा भाव किलोला ५२८०० रुपये झाला आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोनं ४७९५० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४९१५० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेटचा भाव ४८४९० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ५००६० रुपये आहे. त्यात गुरुवारच्या तुलनेत १४० रुपयांची वृद्धी झाली आहे.चेन्नईपाठोपाठ कोलकात्यात २४ कॅरेटचा भाव ५० हजारांवर गेला आहे. आज चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७१८० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ५१४७० रुपये झाला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसोबतचे महत्त्वाचे व्यापारी करार रद्द केले. तसेच चीनने हाँगकाँगवर लादलेल्या प्राचीन सुरक्षा कायद्याविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. तसेच दक्षिण चिनी समुद्रावरील वाढत्या तणावामुळे भौगोलिक संकटही निर्माण झाले. परिणामी पिवळ्या धातूचे दर वाढले. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले की कोरोना विषाणूसंसर्गाची संख्या वाढल्याने अर्थव्यवस्थेभोवतीची चिंता वाढली. परिणामी स्पॉट गोल्डच्या किंमतीत वाढ झाली. अर्थव्यवस्था सुधारणेच्या वाढीव आणि विलंबित कालावधीमुळे गुंतवणुकदारांनी सोन्याच्या सुरक्षित मालमत्तेकडे कल दर्शवला
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times